‘ऑटोनॉमस’ बनले शरद इंजिनिअरिंग कॉलेज : अनिल बागणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:24 IST2020-12-31T04:24:36+5:302020-12-31T04:24:36+5:30
ऑटोनाॅमीमुळे इंडस्ट्रीची गरज ओळखून अभ्यासक्रम तयार करणे, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वैकल्पिक विषय देणे व विद्यार्थ्यांचे सतत मूल्यांकन करणे ...

‘ऑटोनॉमस’ बनले शरद इंजिनिअरिंग कॉलेज : अनिल बागणे
ऑटोनाॅमीमुळे इंडस्ट्रीची गरज ओळखून अभ्यासक्रम तयार करणे, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वैकल्पिक विषय देणे व विद्यार्थ्यांचे सतत मूल्यांकन करणे सहज शक्य होणार आहे.
ऑटोनॉमसमुळे विद्यार्थ्यांना बीटेक डिग्रीसोबत अतिरिक्त ऑनर डिग्री मिळणार आहे. तसेच गुणवत्तापूर्ण प्लेसमेंट देण्याच्या हेतूने महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकरता सॉफ्ट स्किल इम्प्रूव्हमेंट, परदेशी भाषांचे प्रशिक्षण व औद्योगिक क्षेत्रात इंटर्नशिप याचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण व जागतिक दर्जाचे शिक्षण येथे घेता येणार आहे. तसेच शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभही मिळणार आहे. प्राचार्य डॉ. एस. ए. खोत, एस. पी. कुर्लेकर, डॉ. अनिल तुरकमाणे, प्रा. प्रवीण यादव, प्राचार्य बी. एस. तहसीलदार, डॉ. शांतीकुमार पाटील, प्राचार्य रमेश भरमगोंडा, एम. एम. कुंभार यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
‘शरद’चे अल्पावधीतच यश
महाविद्यालयाला यापूर्वी नॅक, एन. बी. ए., तर आता ऑटोनॉमसचा दर्जा मिळाला आहे. नव्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड सायन्स व मेकॅट्रॉनिक्स या अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे.
फोटो - ३०१२२०२०-जेएवाय-११-डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, अनिल बागणे.