औरवाडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा हल्ला सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:17 IST2021-06-27T04:17:09+5:302021-06-27T04:17:09+5:30

बुबनाळ : गौरवाड (ता. शिरोळ) येथील पिसाळलेल्या कुत्र्याने पुन्हा बालिकेबरोबर एकावर हल्ला केला आहे. यात समृद्धी कांबळे, विकास उपाध्ये ...

In Aurwad, stray dogs continue to attack | औरवाडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा हल्ला सुरूच

औरवाडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा हल्ला सुरूच

बुबनाळ : गौरवाड (ता. शिरोळ) येथील पिसाळलेल्या कुत्र्याने पुन्हा बालिकेबरोबर एकावर हल्ला केला आहे. यात समृद्धी कांबळे, विकास उपाध्ये हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याबाबत ग्रामपंचायतीने पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

गौरवाड (ता. शिरोळ) येथील बेघर वसाहतीतील नाजिया सनदी, मसिरा सनदी यांच्यावर पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेऊन हल्ला केला होता. त्यानंतर शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास बौद्ध समाज मंदिर परिसरात राहणाऱ्या समृद्धी अतुल कांबळे हिच्यावर हल्ला केला. त्यानंतर विकास विद्यासागर उपाध्ये यांच्यावरही कुत्र्याने हल्ला केला. यामध्ये त्यांच्या हात व पायाला गंभीर इजा झाली आहे. त्यांना उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान गौरवाड ग्रामपंचायतीने मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

Web Title: In Aurwad, stray dogs continue to attack