काझींना न्याय देण्यास सभागृह दणाणले

By Admin | Updated: July 21, 2015 01:03 IST2015-07-21T01:03:47+5:302015-07-21T01:03:47+5:30

शाळेस भेट न दिल्याने आयुक्तांचा निषेध

The auditorium was adjourned for justice to Kazi | काझींना न्याय देण्यास सभागृह दणाणले

काझींना न्याय देण्यास सभागृह दणाणले

कोल्हापूर : शाळेचे मुख्याध्यापक, क्लार्क अन् शिपाई अशी तिहेरी भूमिका पार पाडणारे महापालिकेच्या रात्रशाळेतील प्रभारी मुख्याध्यापक एस. एच. काझी यांना कधी न्याय देणार, असा सवाल उपस्थित करीत नगरसेवक राजेश लाटकर, सचिन खेडेकर व सतीश घोरपडे यांनी सोमवारच्या सभेत प्रशासनाला धारेवर धरले. काझी यांना फरकासह रक्कम मिळावी, असा प्रस्ताव तीन महिन्यापूर्वी पाठवूनसुद्धा आयुक्तांनी शाळेस भेट न दिल्याने आयुक्तांचा निषेध केला.
महापालिकेच्या कर्मवीर भाऊराव पाटील रात्रप्रशालेतील प्रभारी मुख्याध्यापक एस. एच. काझी हे गेली वीस वर्षे तुटपुंज्या पगारावर राबत आहेत. ‘रात्रशाळेत उजेड आणता-आणता त्यांच्या आयुष्यात काळोख’ या मथळ््याखाली सोमवारी (दि. १३ जुलै) ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेऊन नगरसेवकांनी सोमवारी सभागृह दणाणून सोडले. प्रशासनाला अशा संवेदनशील विषयावर कधी जाग येणार, असा सवालही नगरसेवकांनी उपस्थित केला. राजेश लाटकर व शारंगधर देशमुख यांनी काझी प्रश्नाकडे सर्वांत प्रथम सभागृहाचे लक्ष वेधले. याप्रकरणी सहायक आयुक्त शीला पाटील यांच्याकडे वेळोवेळी मागणी करूनही प्रशासनाकडून थंड प्रतिसाद असल्याचे नगरसेवक सतीश घोरपडे यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत काझी यांना पंधरा दिवसांत मागील फरकांसह वेतनवाढ मिळालीच पाहिजे, रात्रशाळा व्यवस्थित चालावी यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करावे, अशी जोरदार मागणीही घोरपडे यांच्यासह सभागृहाने केली. काझी प्रकरणाचा सर्व तपशीलांसह प्रस्ताव तीन महिन्यांपूर्वीच आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे पाठविला आहे. आयुक्त स्वत: रात्रशाळेला भेट देणार आहेत. आयुक्तांना याविषयी दोनवेळा आठवणही करून दिली. आयुक्तांकडेच काझी यांचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे शीला पाटील यांनी सभागृहास सांगितले. पाटील यांच्या उत्तरावर सभागृह आयुक्तांच्या कार्यप्रणालीवर तुटून पडले.
 

Web Title: The auditorium was adjourned for justice to Kazi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.