शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

उच्च शिक्षण सहसंचालकांचे लेखापरीक्षण करा, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 13:13 IST

कार्यालयाची घेतली झाडाझडत

कोल्हापूर : कोल्हापूर विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयाचे मुंबई महालेखापाल यांच्याकडून तातडीने लेखापरीक्षण करून घ्या, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्रीचंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी उच्च शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. मंत्री पाटील यांनी अचानक विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयास भेट देऊन पाहणी केली. यात शासन निर्देशानुसार ई-ऑफिस शंभर टक्के क्षमतेने सुरू नसल्याचे निदर्शनास आले.उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने सध्या राज्यभरात ‘झीरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल ड्राइव्ह’ ही मोहीम राबविली जात असून, त्यानुसार मंत्री पाटील यांनी या कार्यालयास भेट दिली. सर्व कर्मचाऱ्यांचे वेतननिश्चिती, वैद्यकीय प्रतिपूर्ती, भविष्यनिर्वाह निधी, सेवानिवृत्ती प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी ई-ऑफिस प्रणाली पूर्ण क्षमतेने सुरू करून याचा अहवाल संचालनालय स्तरावरील सहसंचालक यांना देण्याचे निर्देश दिले.विभागीय कार्यालयाने शासन धोरणाशी विसंगत निर्णय घेऊन काहीप्रकरणी लाभ दिल्याने न्यायालयीन प्रकरणे उद्भवली आहेत. नियमबाह्य प्रकरणांची तपासणी करण्याच्या प्रकरणांची सूचना देण्यात आली. संचालनालयाद्वारे विभागातील प्राचार्य, अध्यापक, विद्यापीठ अधिकारी कर्मचारी यांना पत्र पाठवून विभागीय कार्यालयाकडे सादर; परंतु प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा तपशील मागवून घ्या, प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याबाबत संचालनालय स्तरावरील सहसंचालक यांनी व्यक्तिशः लक्ष देऊन कार्यवाही करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

दप्तरदिरंगाई खपवून घेणार नाहीकोणत्याही परिस्थितीत कार्यालयाकडून संस्थाचालक, प्राचार्य, अध्यापक, अध्यापकेतर कर्मचाऱ्यांची अडवणूक होणार नाही. दप्तरदिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा मंत्री पाटील यांनी दिला. दैनंदिन टपाल रोज ई-ऑफिस प्रणालीत स्वीकारून निपटारा करण्याबरोबरच कामकाजात सुधारणा करण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले

कर्मचाऱ्यांना दणका..वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना बदलीची भीती वाटत नाही. त्यामुळे विभागीय सहसंचालक स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणामध्ये आवश्यक बदल करण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.

उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी कार्यालयाचा आढावा घेतला. आम्ही आजपासून शंभर टक्के क्षमतेने ई-ऑफिस सुरू करत आहोत. निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती दिवशीच पेन्शन मंजूर पत्र देण्याचा प्रयत्न आहे. - डॉ. धनराज नाकाडे, विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्रchandrakant patilचंद्रकांत पाटीलministerमंत्री