कचरा वर्गीकरणावर आधारित ध्वनीफित, कलानगरी भजनी मंडळाचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:16 IST2021-07-03T04:16:06+5:302021-07-03T04:16:06+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या ॲटो टिप्परद्वारे नागरिकांना कचरा वर्गीकरण करण्याबाबत आरोग्य कर्मचारी व कलानगरी भजनी मंडळाचे अध्यक्ष अमोल बुचडे यांनी ...

कचरा वर्गीकरणावर आधारित ध्वनीफित, कलानगरी भजनी मंडळाचा उपक्रम
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या ॲटो टिप्परद्वारे नागरिकांना कचरा वर्गीकरण करण्याबाबत आरोग्य कर्मचारी व कलानगरी भजनी मंडळाचे अध्यक्ष अमोल बुचडे यांनी ध्वनीफित तयार केली आहे.
या ध्वनीफितीचे उपायुक्त निखिल मोरे यांच्या हस्ते त्यांच्या दालनात अनावरण करण्यात आले. या ध्वनीफितीद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन ते कचरा वेगवेगळा करतील, अशी आशा मोरे यांनी व्यक्त केली. कलानगरी भजनी मंडळातर्फे उपायुक्त मोरे यांचा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची मूर्ती, शाल व फेटा देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी माहिती शिक्षण व संवाद अधिकारी नीलेश पोतदार, कलानगरी भजनी मंडळाचे उपाध्यक्ष प्रशांत श्रीप्पान्नावर, तृप्ती भोसले, बेबी नाईक, लक्ष्मण सुतार, ओंकार सुतार, संदीप वायचळ, अवधूत पाटोळे, पुरुषोत्तम साबळे, संजय लोहार, नितीन कांबळे उपस्थित होते.