आणखी दोन साखर कारखान्यांचा लिलाव
By Admin | Updated: November 11, 2014 23:23 IST2014-11-11T21:38:21+5:302014-11-11T23:23:53+5:30
राज्य बँकेची कारवाई : पेण बँकेच्या शाखेचाही समावेश

आणखी दोन साखर कारखान्यांचा लिलाव
कोल्हापूर : मराठवाड्यातील दोन सहकारी साखर कारखाने व रायगड जिल्ह्यातील पेण अर्बन बँकेच्या मुंबईतील शाखेचा लिलाव करण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे. त्यासाठी बँकेने आज, मंगळवारीच निविदा मागविल्या असून, निविदा भरण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबरपर्यंत आहे.
१६ डिसेंबरला दुपारी राज्य बँकेच्या मुंबईतील मुख्यालयात सकाळी साडेअकरा वाजता या निविदा उघडण्यात येणार आहेत. बंद पडलेले सहकारी साखर कारखाने विक्री करण्याचा राज्य बँकेने जणू धडाकाच लावला आहे.
पेण अर्बन बँकेच्या मुंबईतील गिरगाव शाखेची थकबाकी २७ कोटी ३३ लाख इतकी आहे. त्यांची गिरगाव शाखा फ्लॅट नंबर २, दुसरा मजला, क्षेत्रफळ ३५५ चौरस फूट श्री लक्ष्मी सरस्वती कृपा, सिटी सर्व्हे क्रमांक २७३, जगन्नाथ शंकरशेठ रोड, क्रांतीनगर रोड, गिरगाव, मुंबई या जागेची विक्री करणार आहे. त्याची राखीव किंमत १ कोटी २० लाख रुपये आहे.
राज्य बँकेने ‘रिकन्स्ट्रक्शन आॅफ फिनान्शियल असेटस् अँड एन्फोर्समेंट आॅफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सरफेसी) अॅक्ट २००२’नुसार या निविदा मागवल्या आहेत. (प्रतिनिधी)
या कारखान्यावर राज्य बँकेचे १४१ कोटी ३९ लाख, तर सहभाग योजनेतील ४९२ लाख कर्ज थकीत आहे. त्यासाठी कारखान्याची इमारत, यंत्रसामग्री व ९२.८५ हेक्टर जमीन विकण्यात येणार आहे. त्याची राखीव किंमत ६२ कोटी रुपये इतकी आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील विनायक सहकारी साखर कारखाना १२५० टन गाळप क्षमतेचा आहे. त्यावर ३१ मार्च २०१४ अखेर ४२ कोटी ४८ लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे.
या कारखान्याची इमारत, यंत्रसामग्री व ८४.१८ हेक्टर जमीन विकण्यात येणार आहे. त्याची राखीव किंमत ३१ कोटी ८२ लाख रुपये आहे.
लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना २५०० टन गाळप क्षमतेचा आहे.