ऊस परिषदेकडे लक्ष
By Admin | Updated: October 21, 2014 23:38 IST2014-10-21T21:19:01+5:302014-10-21T23:38:39+5:30
‘स्वाभिमानी’ची भूमिका काय राहणार, पहिली उचल किती

ऊस परिषदेकडे लक्ष
जयसिंगपूर : विधानसभा निकालानंतर १ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या १३ व्या ऊस परिषदेकडे आता लक्ष लागून राहिले आहे. या ऊस परिषदेत ऊसदरावरून ‘स्वाभिमानी’ची भूमिका काय राहणार, पहिली उचल किती मागितली जाणार आणि आंदोलनाची दिशा कोणती ठरणार याबाबत निर्णय होणार असल्याचे समजते.
राज्य सरकारने ऊसदर नियामक मंडळाची स्थापना केली. मात्र, त्याची अंमलबजावणी केली गेली नाही. शेतकऱ्यांची केवळ फसवणूक करण्याचा एककलमी कार्यक्रम या सरकारने केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला काही आश्वासने दिलेली आहेत. त्याची पूर्तता येणाऱ्या काळात होईल, अशी भूमिका खासदार राजू शेट्टी यांनी उदगाव येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मांडली होती. १ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर ही ऊस परिषद होत असली तरी विधानसभेतील पराभवाचे चिंतनही परिषदेत होण्याची शक्यता आहे. एकूणच विधानसभा निकालानंतर नव्या सरकारबरोबर ऊसदराबाबतही चर्चा आता होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)