हवे ते कॉलेज मिळाले नसलेल्यांचे दुसऱ्या फेरीकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:25 IST2021-09-11T04:25:50+5:302021-09-11T04:25:50+5:30
केंद्रीय समितीने मंगळवारी पहिल्या फेरीची निवड यादी प्रसिद्ध केली. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून निवड यादीनुसार महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष ...

हवे ते कॉलेज मिळाले नसलेल्यांचे दुसऱ्या फेरीकडे लक्ष
केंद्रीय समितीने मंगळवारी पहिल्या फेरीची निवड यादी प्रसिद्ध केली. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून निवड यादीनुसार महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली. त्यात गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेतील एकूण १५७१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. त्यात विज्ञान विद्याशाखेचे ९५७, वाणिज्य मराठी माध्यमाचे २०८, वाणिज्य इंग्रजी माध्यमाचे १५२, कला मराठी माध्यमाचे २३१, कला इंग्रजी माध्यमाच्या १६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पहिल्या फेरीत प्रवेश निश्चिती अंतिम मुदत बुधवार (दि. १५) पर्यंत आहे. काही विद्यार्थ्यांना या फेरीत हवे असणारे कॉलेज मिळालेले नाही. त्यामुळे त्यांनी प्रवेश निश्चित केलेले नाहीत. त्यांनी दुसऱ्या फेरीमध्ये पुन्हा अर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम म्हणजे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत प्रवेश घेणाऱ्यांची संख्या अगदी कमी दिसत आहे. पहिल्या फेरीतील प्रवेशाची गती सोमवार (दि. १३) पासून वाढण्याची शक्यता काही महाविद्यालयांतील प्राचार्यांनी व्यक्त केली आहे.