शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरकरांचे राही, तेजस्विनी, स्वरूप यांच्या कामगिरीकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 13:44 IST

कोल्हापूर : भारतीय नेमबाजी संघ टोकियो ऑलिम्पिकनगरीत शनिवारी दाखल झाला. या संघात कोल्हापूरची सुवर्णकन्या नेमबाज तेजस्विनी सावंत, राही सरनोबत ...

ठळक मुद्देकोल्हापूरकरांचे राही, तेजस्विनी, स्वरूप यांच्या कामगिरीकडे लक्षभारतीय नेमबाजी संघ टोकियो ऑलिम्पिक नगरीत दाखल

कोल्हापूर : भारतीय नेमबाजी संघ टोकियो ऑलिम्पिकनगरीत शनिवारी दाखल झाला. या संघात कोल्हापूरची सुवर्णकन्या नेमबाज तेजस्विनी सावंत, राही सरनोबत आणि पॅरा नेमबाज स्वरूप उन्हाळकर या तिघांचा समावेश आहे. नेमबाजीचे सर्व सामने २३ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान होणार आहेत. त्यामुळे तमाम कोल्हापूरकरांचे डोळे त्यांच्या कामगिरीकडे आतापासून लागले आहेत.टोकियो ऑलिम्पिकचे पडघम वाजू लागले आहेत. त्यात कोल्हापूरच्या तिघांचा भारतीय ऑलिम्पिक नेमबाजी संघात समावेश आहे. तिघांचाही प्रथमच ऑलिम्पिक संघात समावेश झाला आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या पदकाच्या आशा वाढल्या आहेत. २३ जुलै ते २ ऑगस्टमध्ये राहीचा २५ मीटर पिस्तल प्रकारचा इव्हेंट २८ ते २९ आणि तेजस्विनीचा ५० मीटर रायफल थ्री पोझिशन इव्हेंट ३० जुलैला भारतीय प्रमाण ‌वेळेनुसार पहाटे ५.३० ते ९.०० वाजेपर्यंत आहे. तर पॅराऑलिम्पिक स्पर्धेतील स्वरूप उन्हाळकरचा इव्हेंट ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२१ या कालावधीत होणार आहेत.कोल्हापूरची शान, कोल्हापूरचा अभिमानक्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, कोल्हापूरतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजी स्टेडियममधील क्रीडा कार्यालय, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम चौक, एस.एम. लोहिया हायस्कूल परिसर आदी ठिकाणी तेजस्विनी, राही आणि स्वरूप यांचे ह्यकोल्हापूरची शान, कोल्हापूरचा अभिमानह्ण डिजिटल फलक लावण्यात आले आहेत. तर जिल्हाधिकारी कार्यालयात सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020kolhapurकोल्हापूरRahi Sarnobatराही सरनोबतShootingगोळीबार