अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनेकडे लक्ष
By Admin | Updated: December 9, 2014 00:56 IST2014-12-08T21:06:44+5:302014-12-09T00:56:52+5:30
समायोजनेचा तिढा सुटला : जिल्ह्यात अद्यापही १५० अध्यापक ठरताहेत अतिरिक्त

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनेकडे लक्ष
अशोक खाडे -कुंभोज -अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनेचा तिढा मुंबई उच्च न्यायालयाने समायोजनेवरील स्थगिती नुकतीच उठविल्याने सुटला आहे. परिणामी अतिरिक्त शिक्षकांना आता समायोजनेचे वेध लागले आहेत.
शैक्षणिक वर्ष २०१४ मध्ये सन २०१३ नुसार शिक्षक समायोजन करणे शिक्षकांच्या अहिताचे असल्याने याविषयी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने न्यायालयीन लढा देऊन त्यात यशही मिळविले. या निर्णयाने अतिरिक्त शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. आता खोळंबलेले शिक्षक समायोजन तत्काळ व्हावे, अशी मागणी अतिरिक्त शिक्षकांतून होत आहे.
शिक्षक समायोजनेच्या तोंडावर जिल्ह्यात मुख्याध्यापकांची २२, अध्यापकांची ३२९, पदवीधर व विषय शिक्षकांची २६ अशी ३७७ पदे अतिरिक्त आहेत. तर ३१ मुख्याध्यापक, १७९ अध्यापक, ८६ पदवीधर व विषयशिक्षक अशा २९६ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. रिक्तपदे वजा जाता अद्यापही जिल्ह्यातील १५० अध्यापक अतिरिक्त ठरणार आहेत.
सप्टेंबर २०१३ मध्ये अध्यापकांच्या ८७ जागा रिक्त होत्या. त्या २०१४ नुसार १७९ झाल्या आहेत. रिक्त जागा वाढल्याने आपसूकच ९२ शिक्षकांची सोय होणार आहे. शिवाय गतसमायोजनेत गैरसोयीतील हजर न झालेल्या
३२ शिक्षकांना न्याय मिळाला आहे. हे सर्व पुरोगामी शिक्षक संघटनेच्या न्यायालयीन लढ्याच्या यशामुळे शक्य झाले.
- प्रसाद पाटील
(राज्याध्यक्ष, पुरोगामी शिक्षक संघटना)
सप्टेंबर २०१४ नुसार जिल्ह्याच्या विविध तालुक्यांत असणारी शिक्षकांची अतिरिक्त व रिक्त पदे अशी :
तालुक्याचे नावजादा पदेरिक्त पदे
मुख्या.अध्या.पद व विषयएकूणमुख्या.अध्या.पद व एकूणअंंशकालीन
शिक्षक विषय शिक्षक निर्देशक
आजरा३९२१४१२२५०
भुदरगड०७०७२१९३२४०
चंदगड२११११४१२७५३३६
गडहिंग्लज२३१२३५१११३१२
गगनबावडा ००११०१३३१६३
हातकणंगले४८०१८५५११२०३६१२
कागल२३३२३८३८३१४१२
करवीर३९०८१०१५८१३२६५७
पन्हाळा०१६११७५१३८२६१२
राधानगरी०१४०१४४१८२२४९
शाहूवाडी२८५१५१५२१४६७१५
शिरोळ३३०३३६३७१२२२१२
एकूण पदे२२३२९२६३७७३११७९८६२९६१५०