जयसिंगपुरात स्वीकृतच्या तारखेकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:29 IST2021-08-21T04:29:03+5:302021-08-21T04:29:03+5:30
जयसिंगपूर : येथील स्वीकृत नगरसेवक संभाजी मोरे व गुंडाप्पा पवार या दोघांचे राजीनामे मंजूर झाले आहेत. त्यामुळे निवड प्रक्रियेच्या ...

जयसिंगपुरात स्वीकृतच्या तारखेकडे लक्ष
जयसिंगपूर : येथील स्वीकृत नगरसेवक संभाजी मोरे व गुंडाप्पा पवार या दोघांचे राजीनामे मंजूर झाले आहेत. त्यामुळे निवड प्रक्रियेच्या कार्यवाहीला जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. इचलकरंजी प्रांताधिकारी यांच्यामार्फत उमेदवारी अर्ज प्रक्रिया होणार असून निवडीच्या तारखेकडे लक्ष लागले असून मुसा डांगे व सागर आडगाणे यांना संधी मिळणार आहे.
आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटाने आतापासूनच रणनीती सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर नव्याने सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदा गुंडाप्पा पवार यांनी स्वीकृत सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर संभाजी मोरे यांनीदेखील राजीनामा दिला आहे. हे दोन्ही राजीनामे मंजूर झाले असून निवड प्रक्रियेच्या कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. या दोन्ही रिक्त जागेवर मुसा डांगे व सागर आडगाणे यांची निवड निश्चित मानली जात आहे. नगराध्यक्ष यांच्याकडून निवडीची तारीख निश्चित झाल्यानंतर हा कार्यक्रम पार पडणार आहे.