महिला अधिकाऱ्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न निष्पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST2021-02-16T04:26:40+5:302021-02-16T04:26:40+5:30

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या महिला अधिकाऱ्याची समजूत घालण्याचे प्रयत्न ...

Attempts to persuade women officers are futile | महिला अधिकाऱ्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न निष्पळ

महिला अधिकाऱ्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न निष्पळ

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या महिला अधिकाऱ्याची समजूत घालण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी काही पदाधिकारी आणि प्रमुख अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रयत्नांना दाद दिलेली नाही.

गेल्या आठवड्यात या महिला अधिकाऱ्याने विरोधी पक्षनेते विजय भोजे यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार केली आहे. याचा सध्या तपास सुरू आहे. भोजे हे तेव्हापासून न्यायालयीन प्रक्रियेत आहेत. हा प्रकार ताणला जाऊ नये यासाठी शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी सोमवारी प्रयत्न केला. मात्र, संबंधित अधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनीही त्यांच्याशी याविषयी चर्चा केली.

दरम्यान, कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. सोमवारी सायंकाळी पदाधिकाऱ्यांनी कार्यालयामध्ये या आशयाचे लेखी निवेदन दिले. महिला अधिकारी व सदस्य यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर मोहन भोसले, राजाराम वरुटे, रघुनाथ खोत, गौतम वर्धन, सर्जेराव सुतार, गजानन कांबळे, प्रमोद तौंदकर, सु. बा. पाटील, सु. रा. पाटील, रघुनाथ खोत, तानाजी घरपणकर, गुरुराज हिरेमठ, एस. के. पाटील, मंगेश धनवडे, जयवंत पाटील यांच्या सह्या आहेत.

Web Title: Attempts to persuade women officers are futile