शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामप्रकरणी आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 17:37 IST

Crimenews Kolhapur-पांजरपोळ औद्योगिक वसाहतीतील अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार करूनही कारवाई करत नाहीत म्हणून समीर बालेखान पठाण याने महानगरपालिकेच्या नगररचना विभागात अंगावर रॉकले ओतून पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पठाण याला रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला. ही घटना शुक्रवारी रात्री ८.१५ वाजता उपशहर रचनाकारांसमोर घडली.

ठळक मुद्देअनधिकृत बांधकामप्रकरणी आत्मदहनाचा प्रयत्न नगररचना विभागातील प्रकार : समीर पठाणविरुद्ध गुन्हा

कोल्हापूर : पांजरपोळ औद्योगिक वसाहतीतील अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार करूनही कारवाई करत नाहीत म्हणून समीर बालेखान पठाण याने महानगरपालिकेच्या नगररचना विभागात अंगावर रॉकले ओतून पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पठाण याला रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला. ही घटना शुक्रवारी रात्री ८.१५ वाजता उपशहर रचनाकारांसमोर घडली.समीर बालेखान पठाण हा आरटीआय कार्यकर्ता असून, त्याने पांजरपोळ येथील औद्योगिक वसाहतीत लियाकत मोमीन व शहाजी पाटील यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामप्रकरणी चार- पाच महिन्यांपूर्वी तक्रार केली होती.

या तक्रारीची दखल घेतली जात नाही, असा त्याचा आक्षेप होता. म्हणून त्याने शुक्रवारी रात्री ८.१५ वाजता उपशहर रचनाकार रमेश मस्कर यांच्या कार्यालयात त्यांच्यासमोर अचानक कॅनमधील रॉकेल अंगावर ओतून घेतले. त्यानंतर खिशातील काडेपेटी काढून तो पेटवून घेणार तोच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यास रोखले. त्यानंतर मस्कर यांनी पोलिसांना पाचारण करून त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला.याबाबत कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांनी सांगितले की, समीर नदाफ यांनी डिसेंबर २०२० मध्ये दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून कारवाई सुरू झाली होती. ज्यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे, त्या लियाकत मोमीन व शहाजी पाटील यांना नोटीस दिली होती. कोविड काळात बांधकाम तोडण्यास न्यायालयाची मनाई होती. त्यामुळे बांधकाम पाडता आले नाही. म्हणून या दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.मात्र, पठाण याने अनधिकृत बांधकाम करण्यास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवरसुद्धा कारवाई करावी, अशी मागणी प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यासंबंधी कारवाईचा प्रस्ताव प्रशासक बलकवडे यांच्याकडे पाठविला आहे. कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असताना पठाण याने आत्मदहनाचा प्रयत्न केला म्हणून त्याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केल्याचे गायकवाड यांनी सांगितले.समीरने अधिकाऱ्यांना धमकावले समीर याने अंगावर रॉकेल ओतून घेत असताना मी तुम्हला सोडणार नाही, तुम्हा सगळ्यांना कामाला लावतो, अशा शब्दांत अधिकाऱ्यांना धमकावले असल्याचे फिर्यादी गायकवाड यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस