शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

सत्तेसाठी समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न, अभिनेता किरण माने यांनी केला आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 12:48 IST

बहुजन नायक पुरस्काराने इंद्रजित सावंत यांचा नागरी सत्कार

कोल्हापूर : प्रशांत कोरटकर हे एक साधे प्यादे आहे, त्याच्या आडून मेंदूचा ताबा घेऊन राजकीय फायद्यासाठी महापुरुषांच्या बदनामीचे मोठे षडयंत्र रचले जात आहे, असा आराेप अभिनेता किरण माने यांनी केला. सत्तेसाठी आणि सत्ता अबाधित ठेवण्यासाठी समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न वर्चस्ववाद्यांकडून केला जात असल्याचे हे उदाहरण आहे, असेही ते म्हणाले.हिंदू बहुजन महासंघ, मूळनिवासी क्षत्रिय परिषद, अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा योद्धा, कोल्हापूर मावळा, शिवप्रबोधिनी, भवानी फाउंडेशन, संभाजी ब्रिगेड, मराठा समाज सेवा संघटन, राजमाता जिजाऊ ब्रिगेडतर्फे येथील शाहू स्मारक भवनात गुरुवारी शिव-शंभो-फुले-शाहू-आंबेडकर सन्मान परिषदेत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचा बहुजन नायक पुरस्काराने किरण माने आणि ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.माने म्हणाले, छावा चित्रपटाच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न इंद्रजित सावंत यांनी उधळून लावला. शिवरायांच्या महाराष्ट्रात कोरटकरमुळे कलुषित विचारांची माणसे आजही आहेत हे सिद्ध झाले. त्यांच्यामागे सावरकर, गोळवलकर, पुरंदरे यांच्यासारखे कलुषित विचार पसरवणारी विचारधारा आहे. नाटक, सिनेमा, कथा, कादंबऱ्यातून पराक्रमी महापुरुषांची बदनामी केली जात आहे. यामागे प्रोपोगंडा हेच एकमेव हेतू आहे, तो धुडकावून लावून इंद्रजित सावंत यांनी क्रांतीचे वारे पेटविले आहे. त्याचा वणवा पेटवू या.सिनेमा क्षेत्रापासून सावध रहा, असा सल्ला देत माने यांनी चार ऐतिहासिक तथ्यांसोबत एक दोन खोटी माहिती घुसडून लोकांच्या मेंदूवर ताबा घेण्याची ही सनातनी पद्धत आहे. यातून गद्दारांची तीव्रता कमी करण्याचे हे षडयंत्र हाणून पाडू. आपण शिकतोय पण मेंदूचा वापर करत नाही. त्यामुळे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही पायदळी तुडवण्यात येणारी मूल्ये शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या ताकदीतून जोपासू या, असे आवाहन माने यांनी केले.

खचाखच सभागृहया परिषदेला पुरोगामी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. सभागृह खचाखच भरले होते. मध्यला पॅसेजमध्येही लोक बसले होते. शेवटी तर व्यासपीठावर जाऊन काही जणांना बसायला जागा देण्यात आली. गेल्या अनेक दिवसांत या सभागृहाने प्रथमच एवढी गर्दी अनुभवली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkiran maneकिरण माने