शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कोल्हापुरात स्टेशन रोडवरून महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेची सुटका

By उद्धव गोडसे | Updated: October 11, 2023 18:33 IST

दुचाकीला धडक देऊन संशयित पळाले

कोल्हापूर : स्टेशन रोडवर थांबलेल्या एका महिलेचे दोघांनी जबरदस्तीने कारमध्ये बसवून आणि तोंडाला रुमाल लावून अपहरण केल्याची घटना मंगळवारी (दि. १०) मध्यरात्रीनंतर घडली. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी पाठलाग करून जिल्हा न्यायालयासमोर कार अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी धावत्या कारमधून उडी मारून महिलेने स्वत:ची सुटका करून घेतली, तर पोलिसांच्या दुचाकीला धडक देऊन संशयित पळाले.शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्रीनंतर स्टेशन रोडवरील एका बेकरीसमोर संबंधित महिला उभी होती. त्यावेळी कारमधून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी महिलेच्या तोंडाला रुमाल लावून तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. त्यानंतर कार स्टेशन रोडवरून भवानी मंडपकडे गेली. तिथून पुन्हा कार छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. यावेळी महिलेने वाचवा... वाचवा... असा आरडाओरडा केल्याने बंदोबस्तासाठी असलेले लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल अभिजीत चव्हाण यांनी एका होमगार्डसह दुचाकीवरून कारचा पाठलाग सुरू केला. पोलिसांकडून पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच कार भरधाव वेगाने सीपीआर चौक, खानविलकर पेट्रोल पंप, कलेक्टर ऑफिस ते धैर्यप्रसाद मंगल कार्यालयाच्या दिशेने गेली.

पोलिसांनी कारचा पाठलाग करीतच याती माहिती कंट्रोल रूम आणि शाहूपुरी पोलिस ठाण्याला दिली. धैर्यप्रसाद मंगल कार्यालय चौकातून कार सेवा रुग्णालयाच्या दिशेने गेली. सेवा रुग्णालयापासून जिल्हा न्यायालयाच्या दिशेने गेलेल्या कारच्या पुढे जाऊन पोलिसांनी धाडसाने कार अडवण्याचा प्रयत्न केला. कारची गती कमी होताच संबंधित महिलेने कारमधून बाहेर उडी मारून स्वत:ची सुटका करून घेतली. त्याचवेळी पोलिसांच्या दुचाकीला धडक देऊन संशयित निघून गेले. महिलेच्या फिर्यादीनुसार अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल केला असून, शाहूपुरी पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस