जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:26 IST2021-07-30T04:26:11+5:302021-07-30T04:26:11+5:30
कोल्हापूर : पोर्ले (ता. पन्हाळा) येथील सारिका जाधव यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून पेटवून ...

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
कोल्हापूर : पोर्ले (ता. पन्हाळा) येथील सारिका जाधव यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोर्ले गावात अतिक्रमण केल्याचा समज करून जाधव यांचे दुकान ग्रामपंचायतीने हटवले, त्याबाबत न्याय मागण्यासाठी त्यांनी हे आंदोलन केले. याबाबत शाहुपूरी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोर्ले गावात तळ्यानजीक सारिका जाधव यांचे चप्पलाचे दुकान आहे, ते दुकान अतिक्रमणात येत असल्याचा समज करून ग्रामपंचायतीने ते दुकान जमीनदोस्त केले. याबाबत त्यांनी ग्रामपंचायतीकडे अन्यायाविरोधात दाद मागितली होती. पण तेथे न्याय न मिळाल्याने जाधव यांनी गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर येऊन अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत त्यांच्यावर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.