वीज खंडित केल्याने माणगावात एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:26 IST2021-09-18T04:26:16+5:302021-09-18T04:26:16+5:30

रुकडी माणगाव : येथील वंचित बहुजन आघाडीचा अध्यक्ष संतोष राजमाने याने वीजपुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ माणगाव येथील वीज वितरण ...

Attempt of self-immolation in Mangaon due to power outage | वीज खंडित केल्याने माणगावात एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

वीज खंडित केल्याने माणगावात एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

रुकडी माणगाव : येथील वंचित बहुजन आघाडीचा अध्यक्ष संतोष राजमाने याने वीजपुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ माणगाव येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्राच्या प्रवेशद्वारात आत्मदहनाचा प्रयत्न केला. तेथे उपस्थित असलेल्या सरपंच, उपसरपंच यांनी यावेळी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. महावितरण कर्मचाऱ्यांनी तक्रार न केल्यामुळे या प्रकारावर पडदा पडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष राजमाने यांचे दोन महिन्यांपूर्वी वीजबिल सोळा हजार रुपयांच्या आसपास थकीत होते. वीज वितरण कंपनीचे कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडून आठ हजारांची वसुली केली होती. पण दोन महिन्याचे बिल व त्याची थकबाकी असे एकूण दहा हजार रुपयांचे बिल पुन्हा थकले आहे. ही थकबाकी भरण्यासाठी वीज वितरण कर्मचारी त्याला विनंती करत होते. मात्र राजमाने याने हे बिल न भरल्याने कंपनीने त्याचा वीजपुरवठा खंडित केला.

राजमाने याने वीज वितरण कंपनीने कोणतीही लेखी नोटीस न देता पुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी माणगाव महावितरण उपकेंद्र येथे पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याच्या हातातील काडीपेटी सरपंच राजू मगदूम, उपसरपंच अख्तर भालदार, सदस्य अभिजित घोरपडे, वितरण कंपनीचे कर्मचारी प्रशांत जाधव यांनी काढून घेतल्यामुळे पुढील धोका टळला.

१७ माणगाव आत्मदहन

फोटो वीज वितरण कंपनीने पूर्व नोटीस न देता वीजपुरवठा खंडित केल्याचे निषेधार्थ संतोष राजमाने याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Attempt of self-immolation in Mangaon due to power outage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.