शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न : पालकमंत्री पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 13:34 IST

CoronaVIrus Kolhapur : कर्नाटकातील बेल्लारी येथूून कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे केला जाणारा ऑक्सिजनचा पुरवठा गुरुवारी रोखला. पुरवठा पूर्ववत व्हावा यासाठी राज्य शासनाकडून केंद्र शासनाशी बोलणी सुरू आहे. तोपर्यंत अन्य जिल्ह्यांतून कोल्हापूरला ऑक्सिजन मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. ​​​​​​​

ठळक मुद्देकर्नाटकने रोखला पश्चिम महाराष्ट्राचा ऑक्सिजन पुरवठापुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न : पालकमंत्री पाटील

कोल्हापूर : कर्नाटकातील बेल्लारी येथूून कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे केला जाणारा ऑक्सिजनचा पुरवठा गुरुवारी रोखला. पुरवठा पूर्ववत व्हावा यासाठी राज्य शासनाकडून केंद्र शासनाशी बोलणी सुरू आहे. तोपर्यंत अन्य जिल्ह्यांतून कोल्हापूरला ऑक्सिजन मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राला कर्नाटकातील बेल्लारी येथून ५० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होतो. सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, ऑक्सिजनची मागणी देखील वाढली आहे. आधीच जिल्ह्याला रोज अगदी काठावर ऑक्सिजन मिळत असताना गुरुवारी अचानकच कर्नाटक सरकारने हा पुरवठा थांबविल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. याबाबत पालकमंत्री पाटील म्हणाले, केंद्र सरकारकडून दर दोन दिवसांनी देशातील ऑक्सिजन स्थितीचा आढावा घेतला जातो. त्यात कर्नाटकने महाराष्ट्राला करण्यात येणारा ऑक्सिजनचा ५० टन साठा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्य सरकारमधील मंत्री, अधिकारी यांच्याशी चर्चा झाली आहे तसेच हा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी केंद्राशीदेखील बोलणी सुरू आहे. तोपर्यंत राज्यातील अन्य जिल्ह्यांतून ऑक्सिजनचा पुरवठा कसा होईल याचे नियोजन केले जात आहे.दहा टन पुरवठा थांबवावा..पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापुरातून गोव्याला दहा मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. तो थांबवावा आणि बेल्लारीतून थेट गोव्याला ऑक्सिजन पाठवावा, अशी मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे. या निर्णयाचा त्रास कोल्हापूरला होणार आहे; पण त्यातून मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.जिल्हाधिकारी तळ ठोकूनकोरोना रुग्णांसाठी दिवसेंदिवस वाढत्या ऑक्सिजनची मागणी पूर्ण व्हावी, पुरवठा करण्यात कोठेही घोळ केला जाऊ नये यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई हे ऑक्सिजन निर्मिती होते त्या कोल्हापूर ऑक्सिजनसह निर्मिती प्लांटवर तळ ठोकून आहेत. रोज दिवसभरातील कामकाज आटोपले की त्यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार हे ऑक्सिजन प्लांटला भेट देतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजनSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर