घरी राहण्यास विरोध करणाऱ्या पत्नी व मुलावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:15 IST2021-07-12T04:15:56+5:302021-07-12T04:15:56+5:30
कोल्हापूर : घरी राहण्यास विरोध केल्याने पतीने पत्नी व मुलावर हल्ला चढविल्याचा प्रकार शनिवारी कसबा बावड्यात शुगरमील चौकात घडला. ...

घरी राहण्यास विरोध करणाऱ्या पत्नी व मुलावर हल्ला
कोल्हापूर : घरी राहण्यास विरोध केल्याने पतीने पत्नी व मुलावर हल्ला चढविल्याचा प्रकार शनिवारी कसबा बावड्यात शुगरमील चौकात घडला. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले आहेत. जस्मिन दस्तगीर महात (वय ३७) व मुलगा समीर महात (दोघेही रा. कसबा बावडा) अशी जखमींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दस्तगीर बाबासाहेब महात (रा. तहसीलदार प्लॉट, निपाणी, ता. चिकोडी, जि. बेळगाव) स्वतंत्रपणे राहतात. ते पत्नी राहात असलेल्या कसबा बावडा येथील घरी आले, त्यावेळी घरात राहण्यास पत्नी जस्मिन व मुलगा समीर या दोघांनी त्यांना विरोध केला. त्यावेळी संतप्त झालेल्या दस्तगीरने दोघांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर पत्नीला बाजूला ढकलून दिल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली, त्यानंतर त्याने मुलगा समीरवर ब्लेडने हल्ला केला. समीरच्या कानाखाली मानेवर दुखापत झाली. याप्रकरणी पत्नी जस्मिन महात यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात पती दस्तगीरविरोधात तक्रार दिली, त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.