शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: लिपिकाला बढती दिल्याने संस्थाचालकावर केली करणी, स्मशानभूमीत फोटोला टोचल्या टाचण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 12:27 IST

परिसरात भीतीचे वातावरण

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील एका नामांकित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, संचालक आणि प्राचार्य यांच्या छायाचित्रांचा वापर करून अघोरी प्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. करवीर तालुक्यातील वडकशिवाले येथून बाचणी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या स्मशानभूमीत हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.स्मशानभूमीत या पदाधिकाऱ्यांचे फोटो घेऊन त्यावर गुलाल, हळद-कुंकू टाकून टाचण्या मारण्यात आल्या होत्या. तसेच परिसरात पाच नारळ, सहा काळ्या बाहुल्या, लिंबू, गुलाल व तांदळासह काही अघोरी साहित्य सापडले. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून अमावस्येच्या रात्री अशा प्रकारच्या भानामती व जादूटोण्याचे प्रकार घडत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.स्मशानातील खांबाला काळ्या बाहुल्या लावून त्यावर महिला व तरुणींचे फोटो चिकटवून वशीकरणसदृश क्रिया करण्यात येत असल्याचेही निदर्शनास आले आहे. या प्रकरणातील संबंधित पदाधिकाऱ्यांचा गावाशी कोणताही थेट संबंध नसताना त्यांचे फोटो वापरण्यात आल्यामुळे परिसरात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे वडकशिवाले परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, या प्रकाराबाबत शिक्षण संस्थेच्या वतीने अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली असून, "फोटो वापरून जादूटोणा, भानामती करणाऱ्या प्रवृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो. बुरसटलेल्या मानसिकतेला कोणतीही दाद दिली जाणार नाही", असे स्पष्ट केले आहे.

पोलिस आणि जादूटोणा विरोधी पथकाने लक्ष द्यावेवडकशिवाले येथील स्मशानभूमीत वारंवार अशा घटना घडत आहेत. त्यामुळे गावातील महिला, तरुणी आणि नागरिक भयभीत आहेत. इस्पूर्ली पोलिसांनी आणि जादूटोणा विरोधी पथकाने या प्रकारांची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत पारळे यांनी केली आहे.