शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून ढोलगरवाडीच्या तरूणीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 17:20 IST

Crime News Kolhapur- ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील एका विवाहित तरूणीकडून ६ लाख रूपये घेवून नोकरीचे व लग्नाचे आमिष दाखवून पीडीत तरूणींवर अत्याचार केल्याप्रकरणी सहा जणाविरूद्ध गडहिग्लज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

ठळक मुद्देलग्नाचे आमिष दाखवून ढोलगरवाडीच्या तरूणीवर अत्याचारसहा जणांविरूद्ध गुन्हा : एकजण ताब्यात, पाचजण फरार, ६ लाखाची फसवणूक

चंदगड :ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील एका विवाहित तरूणीकडून ६ लाख रूपये घेवून नोकरीचे व लग्नाचे आमिष दाखवून पीडीत तरूणींवर अत्याचार केल्याप्रकरणी अनिल जोतिबा तळगुळकर (वय ३२, रा. मांडेदुर्ग ) याच्यासह भरत सुबराब गावडे (वय ४२, रा. आसगाव), महेश शहापूरकर ( वय ३५, रा. मांडेदुर्ग), उदय संतू पाटील (वय २८, रा. बसर्गे), बाबू शहापूरकर (वय ३०, रा. मांडेदुर्ग), विश्वनाथ ओऊळकर (वय ३२, रा. गौळवाडी, सर्व ता. चंदगड) या सहा जणाविरूद्ध गडहिग्लज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.याप्रकरणातील अनिल जोतिबा तळगुळकर याच्यावर खंडणी व महिलेवर अत्याचार असे दोन गुन्हे दाखल असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित ५ संशयित आरोपी फरार आहेत.पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, पीडित तरुणी ही पोलिस भरतीच्या इच्छेने फाट्यावरील एका अ‍ॅकॅडमीत शिकत होती. त्यावेळी तुला नोकरी लावतो म्हणून पीडीत तरुणीकडून अनिल तळगुळकर व महेश शहापूरकर यांनी ६ लाख रुपये घेतले. अनिलने लग्नाचे अमिष दाखवून पीडीतेवर अनेकदा तिच्यावर अत्याचार केले.दरम्यान, नोकरीसाठी दिलेले पैसे पीडीत तरूणीने परत मागितल्यानंतर अनिलने ते पैसे परत न देता पीडीत तरूणीला मारहाण करून तिच्या आई-वडीलांना जीवे मारण्याची धमकीही दिली. याबाबत पोलिसात तक्रार करण्यास गेले असता भरत गावडे (रा. आसगाव), बाबू शहापूरकर व महेश शहापूरकर (रा. मांडेदुर्ग), विश्वनाथ ओऊळकर व उदय पाटील यांनीही तक्रार मागे घेण्यासाठी धमकावल्याचे पीडीतिने म्हटले आहे.

त्यानंतर या तरुणीने या ६ जणाविरूद्ध गडहिंग्लज पोलिसात फिर्याद दिली. संबंधित संशयित आरोपींविरूद्ध विविध कलमाखाली गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास चंदगड पोलिस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर