शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याचा खजिना मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 21:35 IST

Crimenews, police, kolhapurnews सोन्याचा खजिना मिळवून देण्याच्या बहाण्याने शिरसंगी (ता. आजरा) येथील बाळू धोंडीबा दळवी (वय ४७) या संशयित भोदूबाबाने नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील एका महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केल्याची फिर्याद नेसरी पोलिसात नोंद झाली आहे.

ठळक मुद्देसोन्याचा खजिना मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचारआजरा तालुक्यातील शिरसंगीच्या भोंदूबाबाचा प्रताप, चौघांविरुद्ध नेसरी पोलिसात गुन्हा

नेसरी/कोल्हापूर :  घरातील सोन्याचा खजिना मिळवून देण्याच्या बहाण्याने शिरसंगी (ता. आजरा) येथील बाळू धोंडीबा दळवी (वय ४७) या संशयित भोदूबाबाने नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील एका महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केल्याची फिर्याद नेसरी पोलिसात नोंद झाली आहे.या प्रकरणी दळवी याच्यासह लक्ष्मण सुतार तसेच सावंतवाडी येथील दोघांविरुद्ध जादूटोणा व अघोरी कृत्य केल्याचा गुन्हा नोंद झाला असून शिरसंगीतील भोंदू बाळू दळवी याला अटक केली असून गडहिंग्लज न्यायालयात हजर केले असता त्याला १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.याबाबत नेसरी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, पीडित महिला नेसरी येथे रहाते. फिर्यादीत तिने आपल्यावर डिसेंबर २०१४ ते जानेवारी २०२० दरम्यान संशयित आरोपी बाळू दळवी याने माझ्याकडे दैवी व अलौकिक शक्ती आहे, मी बाळूमामाचा अवतार आहे असे म्हणून तुमच्या घरावर कोणीतरी करणी केली आहे, ती काढतो तसेच तुमच्या घरात सोन्याचा खजिना आहे तो मी तुम्हाला मिळवून देतो, त्यामुळे मी जे सांगतो तसे तुम्ही ऐका असे म्हणून आरोपी दळवीसह लक्ष्मण सुतार व सावंतवाडी येथील दोघांनी आपल्यावर अघोरी प्रकार करून जादूटोणा केल्याची फिर्याद नेसरी पोलिसात नोंद झाली आहे.

दळवी याने आपल्या घरी डिसेंबर २०१४ ते जानेवारी २०२० दरम्यान संमतीशिवाय जबरदस्तीने शरीरसंबंध ठेऊन अत्याचार केल्याची फिर्याद पीडित महिलेने नेसरी पोलिसात दिली आहे. या प्रकरणी दळवी नामक भोंदूबाबाला नेसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  तपास उपविभागीय पोलिस अधिकारी करीत आहेत.कृष्णकृत्याचा प्रतापसंशयीत बाळू दळवी हा स्वतःला संत समजत होता. भूलथापा देऊन अनेकाना त्याने फसविले असल्याची चर्चा आहे. त्याचे या उपविभागात अनेक भक्त असल्याचेही समजते. मात्र त्याच्या या कृष्णकृत्याचा प्रताप यानिमित्ताने दिसला आहे.

स्वयंघोषित देवर्षीया स्वयंघोषित देवर्षी बाळू दळवी हा शिरसंगी येथील घरी संत बाळूमामा यांचा फोटो लावून बाळूमामांचे सच्चे भक्त असल्याचा दिखावा करत असे. अडीअडचणी सोडविण्यासाठी घरी येणाऱ्या गरीब लोकासमोर भोंदू बाळू दळवी हा दैवी शक्ती असल्याचा आभास निर्माण करीत असे. हा पूर्वी जमिनीचे व्यवहार करत असल्याचे तर नेसरी जवळील एका खेड्यात बीयर बार चालवत होता अशीही चर्चा आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर