सावत्र पित्याचा बालिकेवर अत्याचार

By Admin | Updated: July 4, 2017 05:22 IST2017-07-04T05:22:18+5:302017-07-04T05:22:18+5:30

सहा वर्षांच्या सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नराधम पित्याविरुद्ध रविवारी रात्री शाहूपुरी पोलीसांत गुन्हा नोंदविण्यात आला.

Atrocities against stepfather's child | सावत्र पित्याचा बालिकेवर अत्याचार

सावत्र पित्याचा बालिकेवर अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सहा वर्षांच्या सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नराधम पित्याविरुद्ध रविवारी रात्री शाहूपुरी पोलीसांत गुन्हा नोंदविण्यात आला. लिहाज मुजावर असे या संशयिताचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली होती.
२०११ मध्ये पीडितेच्या आईचे पहिले लग्न मुंबई येथील जावेद काझी या तरुणाशी झाले. त्यांच्यापासून तिला मुलगी झाली. घटस्फोटानंतर २०१४ मध्ये तिने लिहाज मुजावरशी दुसरे लग्न केले. तिला लिहाजपासून एक मुलगा आहे. चौकशीनंतर मुजावरवर बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला.

Web Title: Atrocities against stepfather's child