‘लोकमत’च्या चौघा पत्रकारांना अत्रे पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:18 IST2021-06-25T04:18:07+5:302021-06-25T04:18:07+5:30

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘आचार्य अत्रे उत्कृष्ट पुरस्कारां’ची घोषणा गुरूवारी करण्यात आली. १५ ...

Atre award announced to four Lokmat journalists | ‘लोकमत’च्या चौघा पत्रकारांना अत्रे पुरस्कार जाहीर

‘लोकमत’च्या चौघा पत्रकारांना अत्रे पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘आचार्य अत्रे उत्कृष्ट पुरस्कारां’ची घोषणा गुरूवारी करण्यात आली. १५ जणांना हा पुरस्कार जाहीर झाला असून, यामध्ये ‘लोकमत’च्या चार पत्रकारांचा समावेश आहे. नंदकुमार ढेरे (चंदगड), प्रा. सदाशिव मोरे (आजरा), विक्रम पाटील (पन्हाळा) आणि शिवाजी सावंत (भुदरगड) यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच हजार रूपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

नंदकुमार ढेरे चंदगडला तर शिवाजी सावंत गेली अनेक वर्षे ‘लोकमत’चे भुदरगड तालुका बातमीदार म्हणून चांगले काम करत आहेत. प्रा. मोरे हे आजरा तालुका बातमीदार असून, विक्रम पाटील यांनी करंजफेनचे बातमीदार म्हणून छाप पाडली आहे. जिल्हास्तरावरील मुख्य पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र जोशी यांना जाहीर झाला आहे. तालुकास्तरावर नंदकुमार साळोखे (टोप), रघुनाथ दळवी (गगनबावडा), संजय थाेरात (गडहिंग्लज), मधुकर भोसले (कागल), दगडू माने, निनाद मिरजे (शिरोळ), शशिकांत बैलकर, प्रवीण ढोणे (राधानगरी), नीलेश जाधव (करवीर) यांचा अन्य पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.

२४०६२०२१ कोल नंदकुमार ढेरे

२४०६२०२१ कोल सदाशिव मोरे

२४०६२०२१ कोल विक्रम पाटील

२४०६२०२१ कोल शिवाजी सावंत

Web Title: Atre award announced to four Lokmat journalists