शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रूकडी-कोल्हापूर लोहमार्गावरून आत्मक्लेष पदयात्रा: रेल्वे पोलिसांची दडपशाही, आंदोलकांची धरपकड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 18:53 IST

रूकडी रेल्वे प्रवासी व ग्रामस्थांच्यातून संताप 

रूकडी /माणगाव: महालक्ष्मी, कोयना, महाराष्ट्र, सह्याद्री एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांना पूर्वीप्रमाणे थांबा मिळाव्यात तसेच  सांगली व कोल्हापूर येथे असणाऱ्या रेल्वे समस्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रूकडी ते कोल्हापूर लोहमार्गावरून आत्मक्लेष पदयात्रा रूकडी येथून सुरू होताच  रेल्वे पोलिसांनी आंदोलकांना अटकाव करत ताब्यात  घेतले. पदयाञेत सामील होण्याऱ्या प्रवाशांची धरपकड करत आंदोलन दडपशाहीने मोडीत काढले.रेल्वे पोलिसांच्या या दंडूकशाहीविरोधात रूकडी परिसरातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, रूकडी ग्रामस्थांनी रूकडी बंद ठेवून आंदोलनास पाठींबा दिला. सामाजिक कार्यकर्ते अमितकुमार भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे  आंदोलन करण्यात आले होते.एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना पूर्वीप्रमाणे थांबा मिळाव्यात, रेल्वे भूयारी मार्गाचे गलथान काम व गैरसोयीमुळे नागरिकांना होणारा पश्चाताप, सांगली ते कोल्हापूर दरम्यान असणाऱ्या स्थानकावर अतिरिक्त पॅसेंजर गाड्या सोडण्यात याव्यात, प्रवासासाठी तिकीट दर कमी करण्यात यावे, हातकणंगले, माणगाववाडी, रुकडी भुयारी मार्ग मध्ये असणाऱ्या समस्यांचे निराकरण करावे. तसेच रुकडी रेल्वे स्थानकास ऐतिहासिक वारसा असून त्याचा विकास व्हावा यासाठी वारंवार निवेदन देवून, रेल्वे  बंद आंदोलन करून ही रेल्वे विभाग कोणतेही प्रश्न मार्गी लावत नाही. या निषेधार्थ व आदी. मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी  ही आत्मक्लेश लोहमार्ग पदयाञा काढण्यात आली.दरम्यान, पदयाञा सुरू होण्यापूर्वीच मोठा पोलीस फौजफाटा रूकडी रेल्वे स्थानकावर तैनात होता. पदयाञा सुरू होताच पोलिसांना  प्रवाशांची धरपकड करत पदयाञा मोडीत काढली. जमलेल्या काही आंदोलकांना रेल्वे पोलिसांनी घेराव घालून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचे ही कृती पाहून प्रवासी नागरीक खासगी वाहने व बसने मार्गस्थ झाले. रेल्वे  विभागाने दखल न घेतल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा प्रवाशांनी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे