महागणपतीसमोर अथर्वशीर्ष पठण

By Admin | Updated: September 7, 2014 00:47 IST2014-09-07T00:47:03+5:302014-09-07T00:47:18+5:30

कोल्हापूर : कोल्हापुरातील शिवाजी चौक तरुण मंडळाच्या मानाच्या महागणपतीसमोर आज

Atharvashirsha Pathan before the Mahanapaperapati | महागणपतीसमोर अथर्वशीर्ष पठण

महागणपतीसमोर अथर्वशीर्ष पठण

कोल्हापूर : कोल्हापुरातील शिवाजी चौक तरुण मंडळाच्या मानाच्या महागणपतीसमोर आज, शनिवारी सामुदायिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. सकाळी साडेसहा वाजता झालेल्या या कार्यक्रमास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कोल्हापुरातील मानाच्या गणपतींपैकी एक असलेल्या शिवाजी चौक तरुण मंडळाचा २१ फुटी महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी असते. गणेशोत्सवांतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदाही सामुदायिक अथर्वशीर्ष पठण आयोजित करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून संततधार असलेल्या पावसामुळे गतवर्षीच्या तुलनेत आज महिलांची संख्या कमी होती. अथर्वशीर्ष पठणनंतर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. याशिवाय देखावे पाहण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांसाठी मंडळाच्या वतीने रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Atharvashirsha Pathan before the Mahanapaperapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.