शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
6
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
7
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
8
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
9
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
10
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
11
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
12
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
13
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
14
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
15
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
16
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
17
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
18
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
19
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
20
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात

अथर्वच्या उपग्रहाची अंतराळात झेप ! जागतिक स्तरावर दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 12:52 IST

School science Kolhpaur- अॉनलाईन प्रशिक्षण आणि अवघ्या ४ तासाच्या प्रयत्नातून येथील बालवैज्ञानिक अथर्व रविंद्र कदम याने बनविलेल्या सर्वात कमी आकाराच्या उपग्रहाने रामेश्वरम येथून अंतराळात यशस्वी झेप घेतली.त्याची दखल इंडिया बुक रेकॉर्ड, एशियन बुक रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड बुकसह गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकनेही घेतली.

ठळक मुद्दे अथर्वच्या उपग्रहाची अंतराळात झेप ! जागतिक स्तरावर दखल गडहिंग्लज तालुक्यातील हरळी बुद्रूकचा बालवैज्ञानिक

शिवानंद पाटीलगडहिंग्लज : अॉनलाईन प्रशिक्षण आणि अवघ्या ४ तासाच्या प्रयत्नातून येथील बालवैज्ञानिक अथर्व रविंद्र कदम याने बनविलेल्या सर्वात कमी आकाराच्या उपग्रहाने रामेश्वरम येथून अंतराळात यशस्वी झेप घेतली.त्याची दखल इंडिया बुक रेकॉर्ड, एशियन बुक रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड बुकसह गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकनेही घेतली.इचलकरंजी येथील नातेवाईक संदीप पाटील यांनी अथर्वला पुण्यातील डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम इंटरनॅशनल फौंडेशनची लिंक पाठवली होती. त्यातून त्याची रिसर्च पेलोड क्युब चॅनल २०२१ साठी बालवैज्ञानिक म्हणून त्याची निवड झाली.आठ दिवसांचे उपग्रह बनवण्याचे अॉनलाईन प्रशिक्षण त्याने घरातूनच घेतले.दरम्यान, फौंडेशनतर्फे पुण्यात कार्यशाळा झाली.त्यासाठी महाराष्ट्रातील ३५० विद्यार्थ्यांमध्ये अथर्वचीही निवड झाली.त्याठिकाणी मिलींद चौधरी व मोहित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी बनविलेल्या १०० उपग्रहांचे रामेश्वरम येथून हेलीयम बलूनच्या सहाय्याने यशस्वी प्रक्षेपण झाले.त्यात अथर्वच्या उपग्रहाचाही समावेश आहे. अथर्वला आई-वडीलांसह किलबील'च्या संस्थापिका अंजली हत्ती, मुख्याध्यापिका शहजादी पटेल, मुख्याध्यापक आनंदा घोलराखे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सर्वात लहान उपग्रह !उपग्रहांकडून ओझोनच्या थराचे निरीक्षण आणि अतिनील किरणांच्या तीव्रतेचे मोजमाप केले जाते. तर कांही उपग्रहामधून हवामानातील बदल आणि बीजांची उगवण याविषयी संशोधन केले जाणार आहे. अथर्वचा उपग्रह ८० ग्रॅम वजनाचा असून ४ बाय ४ सेंटीमीटर आकाराचा आहे.आवडीमुळेच यश.....!शाळेतील विज्ञान प्रदर्शन आणि मराठी विज्ञान परिषदेतर्फे आयोजित उपक्रमातील सहभाग, तेथे केलेल्या छोट्या प्रयोगांमधून विज्ञानाची आवड निर्माण झाली.त्यामुळेच आपल्याला हे यश मिळाले असल्याचे अथर्वने सांगितले.कामगाराचा मुलगा..!अथर्व हा गडहिंग्लज शहरातील किलबील विद्यामंदिरात नववीत शिकतो.त्याचे वडील रवींद्र कदम (रा.हरळी बुद्रूक (ता.गडहिंग्लज) हे तांबाळे (ता.भुदरगड) येथील साखर कारखान्यात नोकरीला आहेत.घरखर्चाला हातभार लागावा म्हणून आई महानंदा या घरीच खाजगी शिकवणी घेतात.

टॅग्स :scienceविज्ञानSchoolशाळाkolhapurकोल्हापूर