शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

अथर्व तू पुन्हा शाळेला येशील का..? नणुंद्रेतील अथर्वच्या मृत्यूने गाव गहिवरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 19:19 IST

अथर्व हा कोतोलीतील  श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात दहावीत होता. शांत व मनमिळावू स्वभावामुळे गुरूजीन प्रिय विदयार्थी म्हणून त्याची ओळख.

- विक्रम पाटील

लोकमत न्यूज नेटवर्ककरंजफेण : परिस्थितीशी दोन हात करत आई वडीलांनी काबाडकष्ट करून तळहाताच्या फोडासारखा जपून मोठा केला. दहावीच्या वर्गात शिक्षणाचे धडे गिरवू लागला. गोरागोमटा, शांत व मनमिळावू स्वभाव, अभ्यासात अतिशय  हुशार पण नियतीला या सर्व गोष्टी कदाचित बघावल्या नसतील म्हणूनच की काय आठवडाभर सुरू असलेल्या उपचारा नंतर पन्हाळा तालुक्यातील नणुंद्रे येथील अथर्व अरूण पाटील याचा आकस्मित मृत्यू झाला. अथर्व तू पुन्हा शाळेला येशील का..रे, तुझा हसरा चेहरा कसा विसरू रे..असे म्हणत त्याच्या वर्गातील मित्र मैत्रीणींनी फोडलेला हबंरडा पाहून सारा गाव हळहळला.

 अथर्व हा कोतोलीतील  श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात दहावीत होता. शांत व मनमिळावू स्वभावामुळे गुरूजीन प्रिय विदयार्थी म्हणून त्याची ओळख. प्रेमळ स्वभावामुळे मित्रमैत्रीनींचा गोतावळा देखील मोठा होता. आठ दिवसापूर्वी अचानकपणे अथर्वच्या दातातून रक्त येत असल्याचे त्याला जाणवले. त्याने ही बाब घरच्यांना सांगितली. लगेच खासगी दवाखान्यात त्याच्यावर उपचार करण्यात आले. अथर्व पुन्हा शाळेला जाऊ लागला. दोन दिवसांनी तसाच त्रास त्याला पुन्हा जाणवू लागल्याने कोल्हापूरातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. आठ दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते पण अचानक असे काय घडले की,अथर्वने उपचारापुढे हार मानली अनं डाॅक्टरांनी अथर्वचा मृत्यू झाल्याचे कुटूंबियांना सांगितले.

हृदयविकाराचा झटका आल्याचे डाॅक्टरांनी कारण सांगितले असले तरी कोवळ्या वयात अचानक मृत्यू पावलेल्या अथर्वच्या मृत्यूची बातमी त्याच्या घरच्यासह त्याच्या शाळेतील शिक्षक व मित्रमैत्रणींना कळताच सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला. नियमित शाळेत येणारा व मित्र मैत्रणीमध्ये रमणारा  अथर्व आता पुन्हा शाळेत कधीच भेटणार नसल्याने मृतदेह पाहून मित्र मैत्रीणींनी हंबरडा फोडला. मनमिळावू अथर्वच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई ,वडील एक भाऊ असा परिवार आहे.