अथर्व शिंदे, परिसिंग विजेते-
By Admin | Updated: December 21, 2015 00:29 IST2015-12-20T23:53:00+5:302015-12-21T00:29:37+5:30
टेनिस सीरिज

अथर्व शिंदे, परिसिंग विजेते-
कोल्हापूर : केडीएलटीए व योनेक्स सनराईज आयोजित १२ वर्षांखालील अखिल भारतीय मानांकन लॉन टेनिसच्या रविवारी झालेल्या स्पर्धेत प्रथम मानांकित अथर्व शिंदे याने द्वितीय मानांकित अनुप बंगरगीवर मात करीत, तर मुलींमध्ये प्रथम मानांकित परिसिंगने द्वितीय मानांकित रिजुल सिदनाळेचा पराभव करीत अजिंक्यपद पटकावले.
मेरी वेदर ग्राऊंड येथे झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात मुलांमध्ये अथर्व शिंदे याने अनुप बंगरगीचा आक्रमक खेळी करीत आणि ताकदवान फटक्यांनी बेजार करीत ६-०, ६-० असा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली. मुलींमध्ये प्रथम मानांकित परिसिंगने द्वितीय मानांकित रिजुल सिदनाळेचा ६-४, ६-२ असा संघर्षपूर्ण लढतीत पराभव करीत अजिंक्यपद पटकावले.
पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता खलील अन्सारी यांच्या हस्ते बक्षीस समारंभ झाला.
यावेळी एम.एस.एल.टी.चे कौन्सिलर सरदार मोमीन, सचिव दिलीप तावटे, सचिन कदम, प्रभाकर दळवी, मुरलीधर घाटगे, आदी मान्यवर उपस्थित होते.