शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
3
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
4
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
5
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
6
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
7
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
8
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
9
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
10
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
11
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
12
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
14
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
15
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
16
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
17
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
18
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
19
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
20
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019:आटपाडीचा आमदार ठरले दिवास्वप्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 15:45 IST

अखेर आटपाडी तालुक्याचा आमदार करण्यासाठी एका उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झाले नाही. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख किंवा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आग्रह केला. पण त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यामुळे आज तरी आटपाडीचा आमदार, हे दिवास्वप्न ठरल्याचे मानले जात आहे.

ठळक मुद्देआटपाडीचा आमदार ठरले दिवास्वप्न!देशमुख बंधू उमेदवारी अर्ज न भरण्याच्या भूमिकेवर ठाम

अविनाश बाड आटपाडी : अखेर आटपाडी तालुक्याचा आमदार करण्यासाठी एका उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झाले नाही. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख किंवा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आग्रह केला. पण त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यामुळे आज तरी आटपाडीचा आमदार, हे दिवास्वप्न ठरल्याचे मानले जात आहे.खानापूर विधानसभा मतदारसंघ स्थापन झाल्यापासून १९९५ मध्ये अपक्ष म्हणून आमदार झालेले राजेंद्रअण्णा देशमुख यांचा अपवाद वगळता, या तालुक्याचा आमदार झालेला नाही. खानापूर तालुक्याचा आमदारकीबाबत कायम वरचष्मा राहिला आहे.

प्रत्येक विधानसभा निवडणुकीत तालुक्याचा दुष्काळ, टेंभू योजना, पिण्याचे आणि शेतीचे पाणी याबरोबरच तालुक्याचा आमदार हा मुद्दा ऐरणीवर येतो. तसा या निवडणुकीआधीही हा मुद्दा गाजला. गुरुवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत तर सगळ्याच पक्षांचे नेते आक्रमक आणि कमालीचे आग्रही दिसले.तुल्यबळ उमेदवार द्यावा म्हणून अनेकांनी अमरसिंह देशमुख किंवा राजेंद्रअण्णा देशमुख यांनी उमेदवारी करावी, असा आग्रह केला. पण अमरसिंह देशमुख यांनी मी किंवा माझ्या घरातील कुणीही उमेदवारी करणार नाही, तालुक्यातला कोणताही उमेदवार ठरवा, असा आग्रह केला.

पण लोक ऐकत नव्हते. मग शेवटी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता कॉँग्रेसचे नेते राजाराम देशमुख यांनी तालुक्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावण्याची जबाबदारी घेतली. त्या बैठकीत निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांची बैठक कधी होणार आणि निर्णय काय होणार, याची उत्सुकता होती. सायंकाळी राजाराम देशमुख यांनी सर्व नेत्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. पण अनेक नेते परगावी असल्याने बैठकच होऊ शकली नाही.

बैठक होत नाही म्हटल्यावर अमरसिंह देश्मुख यांनी तालुक्यातील सर्व इच्छुकांना संपर्क साधून, तुम्हाला योग्य वाटते ते करा, अर्ज भरा, तुमचा मार्ग मोकळा आहे, असे सांगितले. शुक्रवारी सकाळी देशमुख गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्रित आले. पुन्हा आग्रह झाला. पण देशमुख बंधू उमेदवारी अर्ज न भरण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले आणि पुन्हा एकदा आटपाडीचा आमदार करण्याचा प्रयोग फिसकटला.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाkhanapur-acखानापुरSangliसांगली