शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

सूर्यग्रहण पाहण्यासाठी कोल्हापुरातील खगोलप्रेमी केरळला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 03:16 IST

चिल्लर पार्टीचा समावेश : शिवाजी विद्यापीठातही खंडग्रास ग्रहण पाहण्याची संधी उपलब्ध

संदीप आडनाईक 

कोल्हापूर : कंकणाकृती सूर्यग्रहण गुरुवारी सकाळी देशभरात नऊ वर्षांनी दिसणार आहे. ते पाहण्यासाठी येथील खगोलप्रेमी थेट केरळकडे रवाना झाले आहेत. केरळजवळील कासारगोडजवळ हे सूर्यग्रहण पाहणार आहेत. कुतूहल फौंडेशन, चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ, मुंबईच्या खगोल मंडळामार्फत डॉ. राजेंद्र भस्मे आणि त्यांचे सहा सहकारी तसेच किरण गवळी यांचा समूहही शक्तिशाली दुर्बिणीसह केरळकडे रवाना झाले आहेत. खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी शिवाजी विद्यापीठानेही व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

खास चष्मे

नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी डोळ्यांच्या सुरक्षेचा विचार करून वैज्ञानिक पद्धतीने खास चष्मे बनविले आहेत. शिवाजी विद्यापीठातून ग्रहण पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.कोल्हापुरातील कुतूहल फौंडेशनचे खगोलप्रेमी काही शक्तिशाली दुर्बिणींसह कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्यासाठी मंगळवारी दुपारी केरळकडे रवाना झाले.ग्रहणाची सुरुवात सकाळी ८ वाजून ०४ मिनिटांनी होईल. चंद्राची सावली वरच्या बाजूने सूर्यावर पडण्यास सुरुवात होईल आणि हळूहळू खाली सरकेल. सूर्य झाकला जाईल तसतसा अंधार जाणवेल. सकाळी ९.२३ वाजता ८३.५७ टक्के सूर्यबिंब झाकले जाईल. सावली खाली सरकत असताना थोडी उजवीकडे सरकेल आणि १०.५९ वाजता ग्रहण संपेल. ९.२३ नंतर थोडा-थोडा प्रकाश वाढण्यास सुरुवात होईल व १०.५९ नंतर दिवस पूर्ववत होईल.- प्रा. डॉ. अविराज जत्राटकर 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKeralaकेरळ