बानगेतील रस्त्यासंदर्भात पुन्हा आश्वासनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:23 IST2021-01-25T04:23:48+5:302021-01-25T04:23:48+5:30
म्हाकवे : बानगे येथील ओढ्यावर कमाणी पुलासह या रस्त्याची उंची वाढवून मिळावी यासाठी येथील नागरिकांनी या रस्त्याचे सुरू असणारे ...

बानगेतील रस्त्यासंदर्भात पुन्हा आश्वासनच
म्हाकवे : बानगे येथील ओढ्यावर कमाणी पुलासह या रस्त्याची उंची वाढवून मिळावी यासाठी येथील नागरिकांनी या रस्त्याचे सुरू असणारे काम बंद पाडण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र,याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कुलकर्णी यांनी नागरिकांशी संवाद साधून या मागणीबाबत वरिष्ठांना कळवून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र,याबाबत ठोस निर्णय होईपर्यंत या पूल नजीक काम न करण्याचेही चर्चेअंती ठरले आहे. दरम्यान,पावसाळ्यात बानगे गावाला बेटाचे स्वरूप येते. तरीही रस्त्याचा सर्व्हे करताना अधिकारी कुचराई का करतात? हा प्रश्न असून लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्षच ही बाब गंभीर असल्याची खंतही आंदोलकांनी व्यक्त केली. यावेळी शिवाजी पाटील,चंद्रशेखर सावंत,रमेश सावंत, बाबूराव बोंगार्डे, विनायक जगदाळे, हिंदूराव बोंगार्डे, युवराज बोंगार्डे, सुनील कदम आदी उपस्थित होते.