वडणगेत सहायक शिक्षिकेचे हायस्कूलसमोर उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:25 IST2021-03-09T04:25:54+5:302021-03-09T04:25:54+5:30

मानसिक छळ, शासकीय दस्तावेजात फेरफार व सेवा पुस्तिकेत चुकीच्या नोंदी करणाऱ्या हायस्कूलचे वरिष्ठ लिपिक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची ...

Assistant teacher starts fast in front of high school | वडणगेत सहायक शिक्षिकेचे हायस्कूलसमोर उपोषण सुरू

वडणगेत सहायक शिक्षिकेचे हायस्कूलसमोर उपोषण सुरू

मानसिक छळ, शासकीय दस्तावेजात फेरफार व सेवा पुस्तिकेत चुकीच्या नोंदी करणाऱ्या हायस्कूलचे वरिष्ठ लिपिक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी शेलार यांनी केली आहे.

देवी पार्वती हायस्कूलमधील सहायक शिक्षिका मीनाक्षी शेलार यांनी वरिष्ठ लिपिक आपल्याला नाहक मानसिक त्रास देत असल्याची लेखी तक्रार जिल्हाधिकारी, शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग व राज्य महिला आयोगाकडे केली होती. मात्र, कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने २६ जानेवारी रोजी उपोषणाला बसण्याचा इशारा शेलार यांनी दिला होता. या प्रकरणाची १५ फेब्रुवारीपर्यंत चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे लेखी आश्‍वासन संस्थेने दिल्यानंतर शेलार यांनी उपोषण स्थगित केले होते.

मात्र, संस्थेने दीड महिना झाल्यानंतरही संबंधितावर कारवाई केली नसल्याने त्यांनी सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

फोटो ओळी - वडणगे (ता. करवीर) येथील देवी पार्वती हायस्कूलचे वरिष्ठ लिपिक यांच्यावर कारवाईसाठी सहायक शिक्षिका मीनाक्षी शेलार यांनी सुरू केलेले आमरण उपोषण.

फोटो koldesk ला पाठवला आहे.‌

Web Title: Assistant teacher starts fast in front of high school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.