सहायक निबंधक व्ही.व्ही.हजारे यांनी स्वीकारला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:21 IST2021-01-17T04:21:47+5:302021-01-17T04:21:47+5:30

सरवडे :राधानगरी तालुक्याचे नूतन सहायक निबंधक व्ही.व्ही. हजारे यांनी पदभार स्वीकारला. त्यांचा राधानगरी तालुका पतसंस्था कर्मचारी संघटनेच्यावतीने ज्येष्ठ व्यवस्थापक ...

Assistant Registrar VV Hazare accepted the post | सहायक निबंधक व्ही.व्ही.हजारे यांनी स्वीकारला पदभार

सहायक निबंधक व्ही.व्ही.हजारे यांनी स्वीकारला पदभार

सरवडे :राधानगरी तालुक्याचे नूतन सहायक निबंधक व्ही.व्ही. हजारे यांनी पदभार स्वीकारला. त्यांचा राधानगरी तालुका पतसंस्था कर्मचारी संघटनेच्यावतीने ज्येष्ठ व्यवस्थापक विलास किल्लेदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यापूर्वी त्यांनी महाड तालुक्यात काम केले आहे.

प्रारंभी ज्योतिर्लिंग पतसंस्था कौलवचे मॅनेजर आनंदा कांबळे यांची आमजाई व्हरवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल हजारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी हजारे म्हणाले, ‘तालुक्यातील पतसंस्था उन्नती व प्रगतीसाठी आपण सर्वतोपरी सहकार्य व मार्गदर्शन करू.’ राधानगरी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रंगराव पाटील. उपाध्यक्ष बाळासाहेब कदम, दत्तात्रय पाटील, विजय पोवार, नंदू भांदीगरे, एकनाथ पाटील, कृष्णात येटाळे , उत्तम चरापले , सुरेश खोत, सुरेश नाईक, आदी उपस्थित होते.

स्वप्निल आगम यांनी आभार मानले.

..... फोटो राधानगरीचे नूतन सहायक निबंधक व्ही.व्ही.हजारे यांचा सत्कार करताना ज्येष्ठ मॅनेजर विलास किल्लेदार ,शेजारी रंगराव पाटील, बाळासाहेब कदम व इतर.

Web Title: Assistant Registrar VV Hazare accepted the post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.