सहायक पोलीस निरीक्षक लाच घेताना जाळ्यात
By Admin | Updated: May 15, 2015 00:04 IST2015-05-14T21:54:36+5:302015-05-15T00:04:10+5:30
तासगावात कारवाई : रक्कम स्वीकारताना पकडले

सहायक पोलीस निरीक्षक लाच घेताना जाळ्यात
तासगाव : तासगाव पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक शंकर ओंबासे गुरुवारी अडीच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात सापडला. पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र पाठविण्यासाठी ओंबासेने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. गुरुवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक प्रदीप आफळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. तासगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यासाठी तक्रारदाराकडून सहायक पोलीस निरीक्षक शंकर आबा ओंबासे (वय ५८, रा. कृष्णा अपार्टमेंट, खोली क्रमांक २, तिसरा मजला, पोलीस अपार्टमेंट, तासगाव, मूळ रा. वंजारवाडी) याने तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. म्हणून तक्रारदाराने तक्रार दिली. (वार्ताहर)