शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: बिलाच्या कामाची फाईलसाठी मागितले तीन हजार रुपये, लाचखोर सहाय्यक लेखाधिकारी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 16:06 IST

या कारवाईमुळे पन्हाळा पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली.

कोल्हापूर : रस्ता आणि आरसीसी गटार कामाची फाईल तपासून पुढील कारवाईसाठी विना त्रुटी पाठवण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पन्हाळा पंचायत समितीतील सहाय्यक लेखाधिकार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले. अरुण रघुनाथ मांगलेकर (वय ५५, रा. प्लॉट नं. ६ व ७, मनोरमानगर, देवकर पाणंद, कोल्हापूर) असे लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे पन्हाळा पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली.तक्रारदार हे कंत्राटदार असून त्यांनी पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील रस्त्याचे तीन लाखाचे काम केले आहे. तसेच मौजे आरळे येथील आरसीसी गटरीचे काम केले आहे. या दोन्ही कामाच्या बिलाची फाईल व रक्कम मिळवण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवला होता. या कामासाठी सहाय्यक लेखा अधिकारी मांगलेकर याने विना त्रुटी दोन्ही फाईल कार्यवाहीसाठी पाठवण्यासाठी तीन हजार रुपये यांची लाच मागितली.याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आज दुपारी पन्हाळा पंचायत समितीच्या कार्यालयात मांगलेकर याला तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली.पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, पोसई संजीव बंबरगेकर, पोहेकॉ शरद पोरे, पोना सुनील घोसाळकर, पोकॉ रुपेश माने, मयूर देसाई, हेकॉ विष्णू गुरव यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारी