बैतुलमाल कमिटीतर्फे पूरग्रस्तांसाठी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:28 IST2021-08-14T04:28:58+5:302021-08-14T04:28:58+5:30

कोल्हापूर : कसबा बावडा येथील मुस्लिम बांधव व बैतुलमाल कमिटीच्या वतीने पुरामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबांना जेवणासह इतर मदत करण्यात ...

Assistance for flood victims by Betulmal Committee | बैतुलमाल कमिटीतर्फे पूरग्रस्तांसाठी मदत

बैतुलमाल कमिटीतर्फे पूरग्रस्तांसाठी मदत

कोल्हापूर : कसबा बावडा येथील मुस्लिम बांधव व बैतुलमाल कमिटीच्या वतीने पुरामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबांना जेवणासह इतर मदत करण्यात आली. कमिटीच्या वतीने मागील महापुराच्या काळातही पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला होता.

समाजावरच एखादे अस्मानी संकट येते त्यावेळी जातिधर्मांच्या भिंती आपसूकच तुटल्या जातात; कारण इथं फक्त असते ती माणुसकी आणि हीच माणुसकी माणसातील देवपण दाखवून देते; असाच अनुभव कसबा बावड्यातील पूरग्रस्तांना आला. कसबा बावड्यातील मुस्लिम बांधव व बैतुलमाल कमिटी यांच्याकडून अकरा नंबर शाळा तसेच कसबा बावडा व आसपासच्या परिसरांमधील पूरग्रस्त लोकांना सकाळ-संध्याकाळी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

फोटो ओळी : कोल्हापुरातील कसबा बावडा येथील मुस्लिम बांधव व बैतुलमाल कमिटीच्या वतीने पुरामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबांना मदत करण्यात आली. (फोटो-१३०८२०२१-कोल- कसबा बावडा)

Web Title: Assistance for flood victims by Betulmal Committee