शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

एफआरपी वसुलीसाठी लेखा परीक्षकांची मदत: कारखानदारांत खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 23:30 IST

कोपार्डे : थकीत एफआरपीवर शेतकऱ्यांना व्याज देण्यासाठी साखर आयुक्तांनी कंबर कसली असून, आता यासाठी प्रादेशिक विशेष लेखा परीक्षक वर्ग-१ सहकारी संस्था (साखर) यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. यासाठी प्रत्येक साखर कारखान्याकडून देय व थकीत एफआरपी व थकीत एफआरपीवर होणारी व्याजाची रक्कम याची आकडेवारीसह प्रत्येक कारखान्याकडून माहिती संकलनास सुरुवात झाल्याने कारखानदारांत ...

कोपार्डे : थकीत एफआरपीवर शेतकऱ्यांना व्याज देण्यासाठी साखर आयुक्तांनी कंबर कसली असून, आता यासाठी प्रादेशिक विशेष लेखा परीक्षक वर्ग-१ सहकारी संस्था (साखर) यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. यासाठी प्रत्येक साखर कारखान्याकडून देय व थकीत एफआरपी व थकीत एफआरपीवर होणारी व्याजाची रक्कम याची आकडेवारीसह प्रत्येक कारखान्याकडून माहिती संकलनास सुरुवात झाल्याने कारखानदारांत खळबळ उडाली आहे.

यावर्षी साखर कारखानदार साखर दर घसरल्याने शॉर्ट मार्जिनमध्ये आले होते. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी २५०० रुपये प्रतिटन शेतकºयांना अदा करण्यास सुरुवात केली. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांची हंगाम२०१७/१८ची एफआरपी सरासरी २७०० ते २९५० प्रतिटन बसत आहे. पण शॉर्ट मार्जिन निर्माण झाल्याने एकरकमी एफआरपी देणे अशक्य असल्याने डिसेंबर महिन्यापासून २५०० रुपयेप्रमाणे पहिला हप्ता देण्यास सुरुवात केल्याने २०० ते ४५० रुपये एफआरपीतील रक्कम प्रत्येक कारखान्याची रक्कम थकत गेली. हंगाम संपतासंपता जिल्ह्यातील २२ कारखान्यांकडून शेतकºयांची ५५० कोटी रुपये एफआरपी थकीत राहिली. ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ चे कलम३(३)मधील तरतुदीनुसार १४ दिवसांत एफआरपी देण्याचे बंधन आहे. ही एफआरपी १४ दिवसांत दिली नाही तर कलम ३(३अ) अन्वये ऊस उत्पादकांना विलंब काळापर्यंत १५ टक्के व्याज देणे बंधनकारक आहे अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे.

थकीत एफआरपी व्याजासह शेतकºयांना द्यावी, असा प्रादेशिक साखर आयुक्तांनी १९ जूनला आदेश काढला पण याला कारखानदारांनी ठेंगा दिल्याने अंकुश शेतकरी संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी साखर आयुक्त पुणे येथे ठिय्या आंदोलन केले.याची दखल घेत आता कोल्हापूर विभागाच्या प्रथम विशेष लेखापरीक्षक-१ सहकारी संस्था (साखर) थकीत एफआरपी व त्यावर होणारे व्याज याची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी प्रथम लेखापरीक्षक अजय सासणे यांनी कारखान्यांना हंगाम २०१७/१८ मध्ये पुरवठा झालेल्या उसापोटी एफआरपीप्रमाणे जी १०० टक्केची रकमेतील नियमानुसार १४ दिवसांत रक्कम अदा केली नाही, अशा एकूण किती रकमा व्याजापोटी देय होतात त्यावर १५ टक्केप्रमाणे व्याजाची निश्चित होणाºया रकमांचा समावेश करून अहवाल करण्यासाठी यंत्रणा सुरू केली असल्याने कारखानदारांत खळबळ उडाली आहे.साखरेला हमीभावासाठी प्रयत्न करण्याची गरजथकीत एफआरपीवर व्याजाच्या रकमेचा तगादा कारखानदारांना लावला गेला, तर आर्थिक अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांची अवस्था सूतगिरण्यांसारखी होईल. यामुळे कायदा व व्यवहार सांभाळत साखर उद्योग वाचवायचा असेल, तर या कारवाया मागे घेतल्या पाहिजेत व साखरेला हमीभाव देण्यासाठी हालचाली कराव्यात, असे आपले नाव न छापण्याच्या अटीवर एका साखर उद्योगातील तज्ज्ञाने मत व्यक्त केले. 

कायदा एकरकमी एफआरपी १४ दिवसांत देण्याचा आहे, पण सर्वच कारखान्यांनी त्याला ठेंगा दिला. जर मनात आणून साखर आयुक्तांनी काम केले तर शेतकºयांना न्याय मिळेल.- धनाजी चुडमुंगे,अंकुश शेतकरी संघटना.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने