नवीन वाशी नाका येथे तरुणांवर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:24 IST2021-03-19T04:24:07+5:302021-03-19T04:24:07+5:30

अटक केलेल्या संशयितांची नावे अशी, विकी नैमुद्दीन खान, पुष्कराज प्रताप पाटील (दोघेही रा. खरी कॉर्नर), धीरज राजेश शर्मा (रा. ...

Assault on youth at New Vashi Naka | नवीन वाशी नाका येथे तरुणांवर प्राणघातक हल्ला

नवीन वाशी नाका येथे तरुणांवर प्राणघातक हल्ला

अटक केलेल्या संशयितांची नावे अशी, विकी नैमुद्दीन खान, पुष्कराज प्रताप पाटील (दोघेही रा. खरी कॉर्नर), धीरज राजेश शर्मा (रा. साई मंदिर सुभाषनगर).

वाशी येथील फोटोग्राफी व्यवसाय करणाऱ्या अमृत पाटील याची शहरात राहणाऱ्या एका मुलीशी सोशल मीडियाद्वारे ओळख झाली. या ओळखीतून अमृत याने त्या मुलीचे व तिच्या मैत्रिणीचे आपल्या स्टुडिओमध्ये फोटो काढले होते. ते फोटो देऊन त्याचे पैसे नेण्यासाठी अमृत हा नवीन वाशी नाका येथे एका कॅफे हाऊसमध्ये आला होता. तेथे तो त्या दोन मुलींसोबत गप्पा मारत बसला होता. दरम्यान, मुलींशी गप्पा मारत बसल्याचे दिसल्यानंतर संतप्त झालेल्या विकी खान, पुष्कराज पाटील, धीरज शर्मा याच्यासह पाच-सहा जणांनी अमृत याच्यावर दगड, विटा व काठीने हल्ला करून त्याला जखमी केले. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या हल्लाप्रकरणी तिघा संशयितांना अटक केली.

Web Title: Assault on youth at New Vashi Naka