सरवडेत मुख्य बाजारपेठेत डांबरीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:31 IST2020-12-30T04:31:46+5:302020-12-30T04:31:46+5:30
बाजारपेठ ते निपाणी-राधानगरी रोडला असलेल्या एस. टी. स्टँडपर्यंत जाणारा मुख्य रस्ता असून हा मोठी बाजारपेठ म्हणून परिचित ...

सरवडेत मुख्य बाजारपेठेत डांबरीकरण सुरू
बाजारपेठ ते निपाणी-राधानगरी रोडला असलेल्या एस. टी. स्टँडपर्यंत जाणारा मुख्य रस्ता असून हा मोठी बाजारपेठ म्हणून परिचित आहे. हा रस्ता अत्यंत खराब झाल्याने लोकांना त्रास होत होता. स्थानिक लोकप्रतिनिधींनी रस्ता होण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हा परिषद सदस्या सौ. सविता चौगले व माजी मंत्री दीपक सावंत यांच्या फंडातून या रस्त्याला निधी मंजूर करण्यात आला.
मार्च २०२० मध्ये रस्त्याचे खडीकरण करण्यात आले. लागलीच डांबरीकरण करण्यात येणार होते. मात्र, कोरोनामुळे काम लांबणीवर पडले. त्यानंतर पावसाळा सुरू झाला.आणि काम थांबले. रखडलेले या कामाचे ठेकेदाराने डांबरीकरण सुरू केले असून यंत्राद्वारे डांबरीकरण होत आहे. अनेक महिने रखडलेल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.