शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

भाषण करायला सांगा, ‘एन. डी.’ बरे होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:55 IST

कोल्हापूर : कदमवाडी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची राष्ट्रवादीचे ज्येष्ठ ...

कोल्हापूर : कदमवाडी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी रात्री आठच्या सुमारास भेट घेतली. प्रकृतीची विचारपूस करताना ‘त्यांना भाषण करायला सांगा, ते लगेच बरे होतील’, अशी सूचना मिश्किलपणे पवार यांनी मोठी बहीण सरोज (माई) पाटील यांना केली.शरीरातील प्लेटलेटस् कमी झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून प्रा. पाटील हे कदमवाडी येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी शरद पवार हे साताराहून रविवारी रात्री आठच्या सुमारास कोल्हापूरमध्ये आले. ते थेट रुग्णालयात गेले. पवार हे प्रकृतीची चौकशी करत असतानाच, ‘दलबदलूंना पाडण्यासाठी महाराष्ट्रभर मी फिरणार आहे; त्यामुळे मी तसा सहजासहजी आजारी पडणार नसल्याचे’, प्रा. पाटील यांना सांगितले. त्यावर ‘लढाई करणे ही त्यांची ऊर्जा आहे; त्यामुळे त्यांना भाषण करायला लावा’, ते लगेच बरे होतील’, असा सल्ला पवार यांनी देताच उपस्थितांमध्ये हास्य फुलले. अर्धा तास पवार हे रुग्णालयात थांबले होते. तेथून ते मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका हॉटेलकडे रवाना झाले. त्यांच्यासमवेत उद्योजक व्ही. बी. पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी नगरसेवक आदिल फरास, सुनील देसाई, आदी होते.सरकारबद्दल जनतेत प्रचंड चीडसाताऱ्यातील तुमच्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे समजले, असे प्रा. पाटील यांनी यावेळी सांगितले. त्यावर पवार यांनी सांगितले की, साताºयाबरोबरच उस्मानाबाद, मराठवाडा येथील सभांनादेखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आपल्यापासून काहीसा दुरावलेला युवावर्ग पुन्हा पक्षाकडे येत आहे. भाजप सरकारबद्दल जनतेत प्रचंड चीड आहे. राष्ट्रवादी घेत असलेल्या सभांच्या माध्यमातून त्याची प्रचिती येत आहे.