शिरोळमधील पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी सरकारला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:25 IST2021-09-03T04:25:18+5:302021-09-03T04:25:18+5:30
शिरोळ तालुक्यातील महापूरप्रश्नी कायमस्वरूपी तोडगा निघावा, याबाबत कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी सरकारला उपाययोजना सुचविल्या आहेत. महापुरामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त ...

शिरोळमधील पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी सरकारला साकडे
शिरोळ तालुक्यातील महापूरप्रश्नी कायमस्वरूपी तोडगा निघावा, याबाबत कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी सरकारला उपाययोजना सुचविल्या आहेत. महापुरामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्यांना मदतीची गरज आहे. कोयना धरण झाल्यापासून गाळ काढण्यात आलेला नाही. त्यामुळे पाणी साठविण्याची क्षमता वीस टक्क्यांनी कमी झालेली आहे. बेकायदेशीर बांधकामे, पाण्याचे बदललेल्या प्रवाहामुळे नैसर्गिक स्त्रोतांची पाणी वाहून नेण्याची क्षमता २५ टक्क्यांनी कमी झालेली आहे. सर्वच घटकांचे महापुरामुळे मोठे नुकसान झाले असून महापूर येऊ नये यासाठी कायमस्वरूपी तोडगा निघावा, अशा मागणीचे निवेदन सरकारला देण्यात आले आहे. या वेळी धनाजी जगदाळे, विकास पाटील, दीपक कोळी, संदीप पाटील उपस्थित होते.
फोटो - ०२०९२०२१-जेएवाय-०८
फोटो ओळ - मुंबई येथे माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह शिष्टमंडळाच्यावतीने मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.