शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

अश्विनी बिद्रे यांच्या हत्येची तीन सत्तारूढ आमदारांना कल्पना होती; पतीचा सनसनाटी आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 14:29 IST

माझी पत्नी अश्विनी बिद्रे यांच्या हत्त्येची सत्तारूढ तीन आमदारांना पूर्ण कल्पना होती. हे तिघेही माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील याच्याबरोबरच अभय कुरूंदकर याच्या फ्लॅटवर येऊन गेले होते असा सनसनाटी आरोप मृत अश्विनीचे पती राजू गोरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देअश्विनीचे पती राजू गोरे यांचा सनसनाटी आरोपअश्विनी यांचे वडील जयकुमार, बंधू आनंद यांची पत्रकार परिषदअ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी

कोल्हापूर : माझी पत्नी अश्विनी बिद्रे यांच्या हत्त्येची सत्तारूढ तीन आमदारांना पूर्ण कल्पना होती. हे तिघेही माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील याच्याबरोबरच अभय कुरूंदकर याच्या फ्लॅटवर येऊन गेले होते असा सनसनाटी आरोप मृत अश्विनीचे पती राजू गोरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

बंधू आनंद बिद्रे

गुरूवारी दुपारी गोरे तसेच अश्विनी यांचे वडील जयकुमार व बंधू आनंद यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी मोठा राजकीय दबाव असल्याचाही आरोप केला आहे. राजू गोरे म्हणाले, ११ एप्रिल २0१६ पासून अश्विनी बिद्रे बेपत्ता आहेत.

याच दिवशी संध्याकाळी राजेश पाटील आणि सत्तारूढ तीन आमदार अंधेरी परिसरातील एका हॉटेलवर थांबले होते. तेथे अभय कुरूंदकर याचा फोन आला. यानंतर हे चौघेही कुरूंदकर याच्या फ्लॅटवर गेले. तेथे बराच वेळ हे सर्वजण होते. त्यामुळेच त्यांना या हत्त्येची संपूर्ण कल्पना होती. खडसे यांचा भाचाच यामध्ये अडकल्याने या संपूर्ण प्रकरणाबाबत राजकीय दबाव आहे.

या आहेत मागण्या

  1.  हा गुन्हा फास्ट ट्रॅकमध्ये चालवावा व अ‍ॅड. उज्वल निकम यांची या केसमध्ये नियुक्ती करावी
  2.  अभय याचा भाऊ संजय कुरूंदकर पुण्यात पोलिस दलात आहे. त्याची बदली गडचिरोलीला करावी.
  3. नवी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांना सहआरोपी करा.

 

वडील जयकुमार बिद्रे

एका बाईला मारण्यात कसला पुरूषार्थलष्करामध्ये १८ वर्षे सेवा बजावलेले जयकुमार बिद्रे म्हणाले, परिस्थिती नसतानाही मी तीन मुलांना शिकवलं. अश्विनी शिकली, चांगल्या नोकरीला लागली. एकदा मुलं मोठी झाल्यावर त्यांना आम्ही कशाबाबत आणि काय सांगायचं? मात्र एका बाईला मारण्यात कसला आलाय पुरूषार्थ असा प्रश्न विचारत या प्रकरणी अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी बिद्रे यांनी यावेळी केले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMurderखून