शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
2
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
3
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेनशन संपेल
4
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
5
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
6
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
7
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
8
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
9
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
10
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
11
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
12
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
13
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
14
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
15
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
16
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
17
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
18
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
19
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
20
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या

अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या जीवनाची ‘सिद्धी’, दहावीत मिळवले ९७ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 16:03 IST

कोल्हापूर : दहा वर्षांपूर्वी अपहरण आणि खून झालेल्या तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांची मुलगी सिद्धी ऊर्फ सूची ...

कोल्हापूर : दहा वर्षांपूर्वी अपहरण आणि खून झालेल्या तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांची मुलगी सिद्धी ऊर्फ सूची राजू गोरे हिने दहावीच्या (सीबीएसई) परीक्षेत ९७.२० टक्के गुण मिळवले. दहा वर्षांच्या शैक्षणिक प्रवासादरम्यान न्यायालयीन लढाईत तिचा सहभाग होता. आईचे छत्र हरपल्यानंतर अनेक संकटांचा सामना करीत तिने दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले.अश्विनी बिद्रे-गोरे यांचे अपहरण आणि खून झाला त्यावेळी त्यांची मुलगी सिद्धी ही पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत होती. आईच्या मृत्यूनंतर गुन्ह्याचा तपास आणि न्यायालयीन लढाईत तिचा बराच वेळ गेला. तरीही तिने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमधून तिने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दहावीच्या परीक्षेत तिने ९७.२० टक्के गुण मिळवून आईला आदरांजली वाहिली. तिच्या शिक्षणात कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी वडील राजू गोरे यांनी विशेष खबरदारी घेतली. घरातील नातेवाईक आणि घोडावत स्कूलमधील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन तिला लाभले. पुढे नीटची तयारी करून वैद्यकीय शिक्षण घेण्याची तिची इच्छा आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSSC Resultदहावीचा निकाल