शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गावात जन्माला आलेल्या मुलींना दिले सरपंच पदाचे मानधन, आश्विनी पाटलांचा कौतुकास्पद उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 18:33 IST

सरपंच पदाची मुदत संपेपर्यंत हा उपक्रम सुरुच ठेवणार

अनिल पाटील सरुड : आजही आपल्या वंशाला दिवाच हवा अशी मानसिकता आहे. मात्र याच मानसिकतेला फाटा देत आपल्या गावात मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी यासाठी शाहूवाडी तालुक्यातील सोंडोली गावच्या सरपंच आश्विनी भिमराव पाटील प्रयत्नशील आहेत. यासाठी त्यांनी आपल्याला मिळणारे मानधन गावात जन्माला येणाऱ्या मुलींना देण्याचा निर्णय घेतला. अन् गेल्या वर्षेभरात त्यांनी हे मानधन या मुलींना दिले देखील.सरपंच पदाचे मिळणारे मानधन स्वःता साठी न घेता ही रक्कम गावात जन्माला येणाऱ्या मुलींना देत सरपंच आश्विनी भिमराव पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यानुसार त्यांनी गेल्या एक वर्षात गावात जन्माला आलेल्या १० मुलींना प्रत्येकी १५०० रु प्रमाणे आपल्या मानधनाच्या रक्कमेतून धनादेश दिले आहेत. त्या राबवत असलेल्या या उपक्रमाचे गावात स्वागत होत आहे.फेब्रुवारी २०२१ मध्ये आश्विनी पाटील यांनी सोंडोली गावच्या सरपंच पदाची धुरा हाती घेतली. त्यानंतर ८ मार्च २०२१ रोजी महिला दिनाचे औचित्य साधून त्यांनी त्यांचे पती व संजय गांधी निराधार योजना समितीचे शाहुवाडी तालुका अध्यक्ष भिमराव पाटील यांच्या संकल्पनेतुन सरपंच पदाचे मिळणारे मानधन गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलींना देण्याची घोषणा केली होती. गेल्या एक वर्षात गावात जन्माला आलेल्या १० मुलींना प्रत्येकी १५०० रु प्रमाणे त्यांनी धनादेश स्वरुपात दिले आहेत.ग्राम पंचायतीमध्ये आयोजित कार्यक्रमात  सरपंच आश्विनी पाटील यांच्या हस्ते या धनादेशाचे संबधीत मुलींच्या पालकांना वितरण करण्यात आले. यावेळी उपसरपंच स्वाती पाटील, ग्रा. प. सदस्य शिवाजी सांवत, कमलेश पाटील, आनंदी म्होळे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष भिमराव रामचंद्र पाटील, संपत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

सरपंच पदाची मुदत संपेपर्यंत उपक्रम सुरु ठेवणार समाजात मुलगा  किंवा मुलगी असा भेदभाव होऊ नये व  मुलींच्या जन्माचे  गावात स्वागत व्हावे या उद्देशाने आपण एक महिला सरपंच या नात्याने हा सामाजिक उपक्रम राबविला आहे . यापुढील काळातही आपल्या सरपंच पदाची मुदत संपेपर्यंत आपण हा उपक्रम सुरुच ठेवणार आहे.  - आश्विनी पाटील, सरपंच 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरshahuwadi-acशाहूवाडी