शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: लाच प्रकरण: कमाईपेक्षा जास्त संपत्तीचा संशय, कारंडेंच्या मालमत्तेची होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 11:41 IST

अश्विनी कारंडे हिला न्यायालयीन कोठडी

कोल्हापूर : बिगरशेती परवाना देण्यासाठी कागल तहसीलदार कार्यालयात ३० हजार रुपयांची लाच घेणारी अव्वल कारकून अश्विनी अतुल कारंडे (वय ४६) हिच्या संपत्तीची चौकशी होणार आहे. तिचा पती जिल्हा परिषदेत वरिष्ठ सहायक पदावर आहे. कारंडे दाम्पत्याने मिळकतीपेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आहे.दरम्यान, लाचखोर कारंडे हिला न्यायालयाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तक्रारदाराने भाडेतत्त्वावर घेतलेली जमीन बिगरशेती करण्यासाठी अव्वल कारकून अश्विनी कारंडे हिने तक्रारदाराकडे ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ६० हजारांवर तडजोड होऊन त्यातील ३० हजारांचा पहिला हप्ता घेताना कारंडे ही मंगळवारी (दि. २१) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडली. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिच्या न्यू शाहूपुरी येथील आलिशान बंगल्याची झडती घेतली.मात्र, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. कारंडे हिचा पती जिल्हा परिषदेत आहे. या दोघांच्या मिळकतीपेक्षा त्यांची संपत्ती अधिक असल्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. त्यामुळे दोघांच्या मालमत्तांची चौकशी केली जाणार आहे. कारंडे दाम्पत्य न्यू शाहूपुरी परिसरात वन बीएचके फ्लॅटमध्ये राहत होते. अलीकडेच त्यांनी याच परिसरात सुमारे एक कोटी रुपये किमतीचा आलिशान बंगला खरेदी केला. दागिन्यांसह स्थावर, जंगम मालमत्तांमध्ये त्यांनी मोठी गुंतवणूक केल्याचा संशय आहे. त्यांचा मुलगा शिक्षणासाठी परदेशात आहे, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. कारंडे हिची जिल्हाधिकारी कार्यालयातील कारकीर्दही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. याबाबत तक्रारी देण्याचे आवाहन उपअधीक्षक सरदार नाळे यांनी केले आहे.कार भरून साहित्य लंपास?कारंडे दाम्पत्याच्या न्यू शाहूपुरी येथील बंगल्याच्या आवारात दोन कार होत्या. कागलमध्ये कारवाई झाल्याचे समजताच एका व्यक्तीने बंगल्यातील साहित्य कारमध्ये भरून त्या कार बंगल्यापासून दूर रस्त्याकडेला लावल्या. रात्री एकच्या सुमारास दोन्ही कार निघून गेल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. कारमधून बंगल्यातील चीजवस्तू, रोकड, मालमत्ताची कागदपत्रे लंपास केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग