अशोकराव पाटील यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:18 IST2021-05-28T04:18:11+5:302021-05-28T04:18:11+5:30
कोडोली : कोडोली विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशोकराव शंकरराव पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी सकाळी निधन झाले. ...

अशोकराव पाटील यांचे निधन
कोडोली : कोडोली विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशोकराव शंकरराव पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी सकाळी निधन झाले. शिक्षण संस्थेत ते दीर्घकाळ अध्यक्ष होते. त्यांच्या काळात विविध शाळा व कॉलेज उभारून संस्थेचा विस्तार केला. कृर्षी महामंडळ, वारणा साखर कारखाना व कोडोली अर्बन बँकेत त्यांनी संचालक पद भूषविले होते. खासदार नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांना ओळखले जात होते. सर्वांसोबत काम करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याने सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. कोल्हापूरचे माजी उपमहापौर प्रकाश पाटील यांचे ते बंधू होत. कोडोलीतील प्रमुख मार्गांवरून दुपारी अंत्ययात्रा काढण्यात आली. गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील, कोडोली ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच, जि. प. सदस्य शिवाजी मोरे, दादा लाड यांचेसह विविध संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी त्यांना श्रद्धाजली वाहिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
२७ अशोकराव पाटील निधन