‘आशा, गटप्रवर्तकांना’ वाढीव मानधन मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:23 IST2021-09-13T04:23:06+5:302021-09-13T04:23:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : आशा व गटप्रवर्तकांना वाढीव मानधनासह इतर मागण्यांचा प्राधान्याने विचार करावा, या मागणीचे निवेदन कोल्हापूर ...

‘आशा, गटप्रवर्तकांना’ वाढीव मानधन मिळावे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आशा व गटप्रवर्तकांना वाढीव मानधनासह इतर मागण्यांचा प्राधान्याने विचार करावा, या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले. आशा व गटप्रवर्तकांचे १० सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून रविवारी युनियनच्या वतीने मंत्री मुश्रीफ यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. राज्य व जिल्हास्तरीय थकीत व वाढीव मानधन मिळावे, ग्रामपंचायतीकडून मिळणारा कोविड प्रोत्साहन भत्ता मागील फरकासहित एप्रिल २०२० पासून मिळावा, गटप्रवर्तकांना सॉफ्टवेअर भत्ता फरकासहित वर्ग करण्यात यावा, गटप्रवर्तकांना आरोग्य वर्धीनीमध्ये समावेश करण्यात यावा, अशा मागण्या मंत्री मुश्रीफ यांच्याकडे करण्यात आल्या. यावेळी ‘सिटु’चे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे, शिवाजी मगदूम, नेत्रदीपा पाटील, उज्ज्वला पाटील, मनीषा पाटील, माया काशीद, सविता आडुरे, राणी मगदूम, शोभा संकपाळ, सुनंदा सोळसे, उज्ज्वला मेंगाणे, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : आशा व गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन रविवारी युनियनच्या वतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले. (फोटो-१२०९२०२१-कोल-आशा)