आशा, गटप्रवर्तकांची जिल्हा परिषदेसमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST2021-06-17T04:17:51+5:302021-06-17T04:17:51+5:30

कोल्हापूर : विविध मागण्यांसाठी आशा आणि गटप्रवर्तक यांनी जिल्हा परिषदेसमोर दुपारी दोन तास जोरदार निदर्शने करून रस्ता अडवून धरला. ...

Asha, group promoters protest in front of Zilla Parishad | आशा, गटप्रवर्तकांची जिल्हा परिषदेसमोर निदर्शने

आशा, गटप्रवर्तकांची जिल्हा परिषदेसमोर निदर्शने

कोल्हापूर : विविध मागण्यांसाठी आशा आणि गटप्रवर्तक यांनी जिल्हा परिषदेसमोर दुपारी दोन तास जोरदार निदर्शने करून रस्ता अडवून धरला.

गटप्रवर्तकांचे ११ महिन्यांचे करारपत्र बंद करून त्यांना आशांप्रमाणे कायम नियुक्तीचे पत्र देण्यात यावे, गटप्रवर्तकांना आशांप्रमाणे रेकॉर्ड कीपिंगसाठी ३ हजार रुपये मोबदला मिळावा, राष्ट्रीय मोहिमांमध्ये गटप्रवर्तकांना वेगळा मोबदला मिळावा, २५ रुपये असलेल्या दैनिक भत्त्यात वाढ करावी, प्रसूती व वैद्यकीय रजा पगारी मिळाव्यात, आशा सॉफ्टेवअर भरण्यासाठी ५० ऐवजी प्रतिदिवस ५०० रुपये भत्ता मिळावा, वेतनपत्रक मिळावे, शहरी भागात २५ आशामागे एक गटप्रवर्तक नेमण्यात यावी, ५०० रुपये मोबाइल भत्ता मिळावा, ग्रामपंचायतीने एप्रिल २०२० पासूनच्या प्रोत्साहन भत्त्याचा फरक मिळावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. जिल्ह्यातून आलेल्या आशा व गटप्रवर्तकांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार यांच्याशी विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. कॉ. चंद्रकांत यादव, कॉ. भरमा कांबळे, जिल्हाध्यक्षा नेत्रदीपा पाटील, ज्योती तावरे, उज्ज्वला पाटील, माया पाटील, संगीता पाटील यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

१६०६२०२१ कोल झेडपी ०१

कोल्हापुरात बुधवारी विविध मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शने केली.

Web Title: Asha, group promoters protest in front of Zilla Parishad