जिल्ह्यातील आशा पुन्हा आंदोलनाच्या तयारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:59 IST2021-02-05T06:59:53+5:302021-02-05T06:59:53+5:30
: जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांना गेल्या तीन महिन्यांचे मानधन अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे आशा पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात ...

जिल्ह्यातील आशा पुन्हा आंदोलनाच्या तयारीत
: जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांना गेल्या तीन महिन्यांचे मानधन अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे आशा पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. वाढीव मानधनासंदर्भात त्यांनी ऑक्टोबरमध्ये ‘काम बंद आंदोलन’ केले होते. त्याची दखल थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेत त्यांचा प्रश्न मार्गी लावला होता.
कोरोनाकाळात आरोग्य विभागाला महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या गटप्रवर्तक व आशांंना वेळेत मानधन देताना शासनाची नेहमीच कुचराई होत आहे.
दरम्यान, सध्या या आशा पोलिओ लसीकरणामध्ये कार्यरत आहेत. मुळात तुटपुंजे असणारे मानधनही तीन-तीन महिने मिळत नाही. ही दुर्दैवी बाब आहे. अधिकाऱ्यांचे पगार वेळेत होतात. मात्र,आशांना मानधन देताना निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नेमून दिलेली कामे करायची की हक्काच्या मानधनासाठी झगडत राहायचे, असा प्रश्न आशांसमोर आहे.
कोट...
येत्या आठ दिवसात तीन महिन्यांचे संपूर्ण मानधन मिळावे. अन्यथा पल्स पोलिओची मोहीम संपली की जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू.
उज्ज्वला पाटील
जिल्हा सचिव, आशा व गटप्रवर्तक युनियन